विकास हेच आमचे अंतिम उद्दिष्ट-सौ राणीताई निलेश लंके
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
विकास हेच आमचे अंतिम उद्दिष्ट-सौ राणीताई निलेश लंके
रांजणगाव मशीद येथे आमदार स्थानिक निधीतून ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत विविध विकास कामांचा उदघाटन सोहळा आज अहमदनगर जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.राणिताई निलेश लंके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
देशामध्ये लोकशाही पद्धतीमध्ये ग्रामीण भागाचा विकास करणे,त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हे आमदार साहेब व जि.प.सदस्य या नात्याने निश्चितपणे आमचे कर्तव्य आहे.आणि त्याच दृष्टीकोनातून साईबाबा मंदिर समोर सभामंडप बांधणे १० लक्ष रु. निधी व कब्रस्थान सुशोभिकरण करणे १० लक्ष रु.निधी मंजूर करण्यात आला.
पुढील काळात देखील या गावच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार साहेब व मी कटिबद्ध असेल.
असे आश्वासन मा.सौ.राणिताई निलेश लंके यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी उपस्थित सौ.सुवर्णाताई अतुल घाडगे (महिला तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी),गोवर्धन शिंदे, संग्राम इकडे,सुनील राव शिंदे पाटील ,कचरू मेहेत्रे ,मोहन मेहेत्रे, सुनील गाढवे ,समीर आत्तार ,अनिस मण्यार ,दिलीप इकडे, रफिक मण्यार ,तोसिक मण्यार ,चंदू तागड, अनिल साबळे, सुरेश गारकर, पंजाबराव शिंदे पाटील, अतुल घाडगे, समीर मणियार ,गुलाम अली मणियार, तानाजी गाढवे ,चंद्रकांत जवक, शरद सरोदे, सुभाष बनकर ,आबा साळुंके ,बाळासाहेब केरू शिंदे, रामदास गाढवे ,उल्हास गाढवे, प्रज्वल इकडे, राजू गाढवे, संतोष लोणकर, प्रशांत निर्वाण ,मंजुश्रीताई सुनील शिंदे पाटील, वृषाली संग्राम इकडे ( ग्रा. सदस्य) लक्ष्मी लोणकर, नंदाबाई शितोळे यावेळी उपस्थित होते