पैठण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
पैठण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन
पैठण : वंचित बहुजन आघाडी तर्फे पैठण तहसील कार्यालय समोर मौजे विजयपुर ता शेवगाव व मौजे शेवता ता पैठण येथील त्रस्त रहीवाशी व शेतकरी बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष प्रभाकर बकले मामा व शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई यांच्या नेतृत्वात जोरदार ठिय्या आंदोलन केले या बाबत पैठण तहसीलदार व पैठण पोलिस निरीक्षक यांनी तत्पर आंदोलनाची दखल घेवून आवघ्या ४८ तासात मौजे विजयपुर व शेवता येथील शिव रस्ता खुला करुन दिला या प्रसंगी बिडकीन पोलिस ठाणेअंमलदार सह पोलिस प्रशासनचा मोठा फाटा उपस्थित होता ही आहे वंचित बहुजन आघाडीची किमया या बाबत मौजे विजयपुर व शेवता येथील मंडलाधिकारी भडके, उपसरपंच दळेमामा ,शेख शब्बीर भाई, लक्ष्मण जगदाळे , पांडुरंग जगदाळे , लक्ष्मण गायकवाड़, विठ्ठल गरड, राजू आव्हाड,भाऊसाहेब रासने, विठ्ठल जगदाळे, समस्त स्वाभिमानी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण व शेवगांव,पैठण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मा तहसीलदार शेवगाव,पैठण तसेच पैठण पोलिस प्रशासनचे मनपुर्वक आभार व्यक्त केले औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष प्रभाकर बकले मामा म्हणाले की औरंगाबाद जिल्ह्याच्या कोणत्याही समस्या असतील तर वंचित बहुजन आघाडी लोकशाही व संविधानिक मार्गाने सोडवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.