वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संत गाडगे महाराज जयंती व भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारत रत्न मौलांना अब्दुल कलाम आझाद यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संत गाडगे महाराज जयंती भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारत रत्न मौलांना अब्दुल कलाम आझाद यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
शेवगाव वंचित बहुजन आघाडी तर्फे संत गाडगे महाराज जयंती व भारताचे पहीले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या प्रसंगी अनेक वक्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली गाडगेबाबा हे उच्च दर्जाचे प्रबोधनकार होते असे मत विजय हुसळे यांनी व्यक्त केले. गाडगेबाबा यांची जयंती व थोर शिक्षण तज्ञ, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची पुण्यतिथी शेवगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे संपर्क कार्यालय येथे साजरी करण्यात आली याप्रसंगी हुसळे बोलत होते. गाडगे बाबा हे आडाणी असून देखील देव भोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत सर्वांना ते आपल्या कीर्तनात गुंतवून ठेवत असत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या तर्का पलीकडे आहे असे प्रबोधनकार ठाकरे म्हणत असत. किर्तन हे प्रभावी माध्यम त्यांनी प्रबोधनासाठी निवडले होते. देव हा दगडात नसून तो माणसांमध्ये पहा. असे ते कीर्तनातून सांगत असत. समाजातील अंधश्रद्धा अज्ञान कर्मकांडे दूर करण्यासाठी विविध उदाहरणांचा ते दाखला देत असत. याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्या भेटीचे काही प्रसंगही हुसळे यांनी सांगितले. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे देशासाठी असलेले योगदान त्याविषयीही त्यांनी माहिती सांगितली. याप्रसंगी रावसाहेब जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. चर्मकार संघाचे गोरख वाघमारे, रमेश खरात, भानुदास गायकवाड, अन्सार भाई कुरैशी, अनिल साळवे, शिवाजी कुसळकर , आदर्श बनसोडे,रामभाऊ कुसळकर ,सुरज मोहीते व ईतर सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख यांनी मानले.