इतर
मा.वाल्मीक ढाकणे यांचेकडुन जि प प्रा शाळा हनुमान नगर ५०००/हजार रुपयाची आर्थिक मदत
वार्ताहर /संपादक अशोक आव्हाड
मा.वाल्मीक ढाकणे यांचेकडुन जि प प्रा शाळा हनुमान नगर ५०००/हजार रुपयाची आर्थिक मदत
पाथर्डी तालुक्यातील काटेवाडी येथील समाजभान व सामाजिक बांधिलकीने भारावलेले व्यक्तिमत्त्व श्री.वाल्मीक ढाकणे साहेब यांनी जि.प.प्रा.शाळा हनुमाननगर (भारजवाडी) शाळेला मैदानासाठी रोख ५०००/- रुपयांची आर्थिक मदत केली. वाल्मीक साहेब नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांच्या ७५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वडीलांच्या वजनाएवढी आवांतर वाचण्याची पुस्तकं व वह्यांचे वाटप विविध शाळांमध्ये केले.
चांगले विचार आणि चांगली कृती असणाऱ्या माणसांमुळे समाज प्रगती करत असतो हाच संदेश वाल्मीक साहेबांच्या कृतीतुन मिळतो. असे यावेळी लहु बोराटे सर सर यांनी सांगितले