श्रीरामपूर चा वधूवर मेळावा यशस्वी करा — मधुकरराव मैड.
शेवगाव प्रतिनिधी संतोष चिंतामणी
श्रीरामपूर चा वधूवर मेळावा यशस्वी करा — मधुकरराव मैड.
बीड– महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यातील खोकर फाटा,सबस्टेशन समोर,’ अन्नपुर्णा मंगलकार्यलय ‘ येथे 26 मार्च 2023 रविवार रोजी भव्य राज्यव्यापी वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला असून सोनार समाजातील उपवर मुला मुलींना वधूवर मेळाव्यात आणण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व समाजबाधंव यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून संघटनेची भुमिका समजून सांगुन समाजहिताच्या उपक्रम राबविण्यात सहकार्य करावे असे समाजाचे नेते, संघटनेचे अध्यक्ष मधुकरराव मैड यांनी सांगितले.*
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष, प्रसिद्ध सराफ *मंगेशशेठ लोळगे* होते.
यावेळेस *मंगेशशेठ लोळगे* म्हणाले कि संघटनेच्या समाजहिताच्या वधूवर मेळाव्यास बीड तसेच मराठवाडय़ातील सर्व सोनार समाज आपल्या उपवर मुलामुलींना जास्तीत जास्त संख्खेने आणतील,आज वधूवर मेळावा कामाची गरज आहे.यासाठी समाजाने उपस्थित राहुन सहकार्य करावे.
यावेळेस वधूवर मेळावा नियोजन कमिटी अध्यक्ष *प्रकाशशेठ बोकन* म्हणाले कि वधूवर मेळाव्यास जे लग्न जमतील त्यांचे लग्न मोफत लावून देण्यात येईल, त्यांना संघटनेच्या वतीने कपडे ,भांडे,चप्पल बुट मंगळसूत्र, पट्या तसेच जे वधूवर मेळाव्यात लग्न लावतील त्या मुलीचे पहिले बाळांतपण खर्च संघटना करेल त्यासाठी जो खर्च येईल तो मी स्वता देण्याचे यावेळेस जाहीर केले.
बीड जिल्हाध्यक्ष *सुधाकरराव बेदरे* यांनी वधूवर मेळाव्यात समाजाने आपल्या उपवर मुली आणून समाजातील होतकरू , संस्कारमय, आपलेपणा टिकण्यासाठी आपल्या लाड शाखेतील मुलांची निवड करावी
यावेळेस बीड संघटनेचे वतीने उपस्थित मान्यवर यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.
मिटींगसाठी यावेळी नगरसेवक दिलीपशेठ नागरे, सोमनाथशेठ महाले, रमणशेठ ,रामेश्वर शहाणे,सुधाकरराव दहिवाळ,गणेश बागडे,कैलास मैड,गणेशशेठ बेद्रे, हनुशेठ डहाळे, सचिनशेठ बेदरे, अमीतशेठ बागडे,गणेशशेठ दहिवाळ,प्रमोदशेठ शहाणे,दत्तुशेठ दहिवाळ,अशोकराव अंबिलवादे,बंडुशेठ टाक,तसेच संघटनेचे व समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.