शेवगाव नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये वादग्रस्त मोची गल्लीतील काढले
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
शेवगाव नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये वादग्रस्त मोची गल्लीतील काढले अतिक्रमण
शेवगांव : नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने काढले पोलीस बंदोबस्तात ते वादग्रस्त मोची गल्लीतील अतिक्रमण रस्त्याने घेतला मोकळा श्वास
काल मी शेवगावकरच्या संडे स्पेशल दणक्याने मोची गल्लीतील अतिक्रमण झाल्याच्या वृत्ताने नगरपरिषदेचा अतिक्रमण विभाग खडबडून जागा झाला आज दुपारी पोलीस बंदोबस्तात ते भर रस्त्यातील अतिक्रमण नागरपरिषदचे बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनटक्के अतिक्रमण विभागाचे मुकादम भानुदास गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेवगांव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी हेड कॉन्स्टेबल रामेश्वर घुगे त्यांचे सहकारी सुखदेव धोत्रे आणि राजेंद्र ढाकणे यांच्या बंदोबस्तात सरसकट नवे आणि जुने भर रस्त्यात झालेले अतिक्रमण काढल्याने
परिसरातील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी केले समाधान व्यक्त लवकरच शेड खालचे ओटे सुद्धा पालिकेचा आरोग्य विभाग काढुन घेणार आहे आणि परत यां जागेवर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करणार असल्याचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी सांगितले
काही महाभागांनी यां अतिक्रमणाला जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला पण नागरपरिषद शेवगांव आणि शेवगांव पोलिसांनी धडक कारवाई केल्याने सर्वसामान्य शेवगांवकर खुश झाले आहेत शेवगांव शहरातील एवढा एकच रस्ता मोकळा आहे त्यावरही काही लोकांची नजर आहे