पैठणला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल हस्ताक्षर
पैठण प्रतिनिधी
बबन उदावंत
पैठणला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल हस्ताक्षर
पैठण : येथील पुरातन वस्तुसंग्रहालय हे पर्यटकांसाठी खुले करण्यात यावे.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान म्हणूनच महाराजांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या प्रत्येक वस्तूचे मोल हे अनमोल असेच आहे. आज अनेक वस्तू कागदपत्रे महाराजांची कागदपत्रे म्हणून जगासमोर येत असतात परंतु गेल्या ५०- ६० वर्षापासून महाराष्ट्राच्या या आराध्य दैवताचे हस्ताक्षर पैठण येथील बाळासाहेब पाटील शासकीय वास्तुसंग्रहालयात जतन केले गेलेले आहे. इतिहास संशोधक कै. श्री बाळासाहेब पाटील यांनी आपलं आयुष्य खर्ची घातले ते इतिहासासाठी, त्यांच्या याच इतिहास समर्पणातून जवळपास ३० हजार पुरातन वस्तू व ९००० हजार पोथ्या जमा झाल्या होत्या. १९५० च्या दशकामध्ये याच संग्रहाच्या निमित्ताने बाळासाहेबांच्या हाती मोठा खजिनाच लागला पैठणच्या एका वाड्यातील तळघरात बाळासाहेबांना सापडलेल्या कागदपत्रात विद्यमान होते ते साक्षात थोरल्या महाराजांच्या हस्ताक्षर त्याकाळी सापडलेल्या या अस्सल कागदपत्रांचे महत्त्व बाळासाहेबांच्या लगेच लक्षात आले. महाराजांच्या या पैठणला सापडलेल्या हस्ताक्षरावरून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक विश्वास त्यावेळी मोठी खळबळ माजली होती. अनेक दावे- प्रतिदावे या हस्ताक्षरून केले गेले होते. अनेक इतिहास संशोधकांनी या कागदपत्रांचा अभ्यास केला व त्या कालच्या कित्येक दिग्गज इतिहासकारांनी हे हस्ताक्षर महाराजांचेच असल्याचा निर्वाळा दिला होता. या दिग्गजांमध्ये जागतिक कीर्तीचे इतिहास संशोधक ही होते.
छत्रपती शिवाजी महाराज पैठण क्षेत्री दोन वेळेस येऊन गेल्याचे ऐतिहासिक संदर्भ मिळतात (कदाचित याहीपेक्षा जास्त वेळा महाराज पैठणला येऊन गेले असावे) यात आग्रा भेटीच्या वेळी व जालनापूर मोहिमेच्या वेळीस महाराज यांनी पैठण येथील ग्रामदैवत असणाऱ्या दोनेश्वर मंदिरात अभिषेक केला होता व याच वेळेस महाराजांनी आपल्या म्हणजे भोसले कुळाचा इतिहास व वंशावळीची माहिती इथल्या कावले भट्ट यांच्याकडून घेतली होती. व याच दरम्यान भोसले कुळाचे तीर्थोपाध्ये म्हणून पैठण क्षेत्राच्या असणाऱ्या कावलेभट्ट याची नेमणूक केली होती.याच संदर्भातील हे हस्ताक्षर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षर मिळवण्यामागेही मोठा इतिहास व बाळासाहेबांचे परिश्रम तर आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांचे हे हस्ताक्षर महाराष्ट्राला त्यांनी ज्ञात करून दिले व ते पैठण येथे सापडलेले असल्यामुळे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे व ते पैठणकरांसाठी भूषणास्पद असेच आहे.
महाराष्ट्राचा हा अनमोल ठेवा पैठणच्या संग्रहालयात जाऊन एकदा बघायलाच हवा व मस्तकी धरायलाच हवा.