जांभळी येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
वार्ताहर /संपादक
अशोक आव्हाड
जांभळी येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील जांभळी येथील सालाबाद प्रमाणे महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी सकाळी प्रथम शंकर महादेवाच्या पिंडांची अभिषेक व पूजा करण्यात आली त्यानंतर दहा ते बारा ह भ प रामकृष्ण महाराज विठ्ठल गड यांचे सुमधुर असे काल्याचे किर्तन झाले त्यानंतर आलेल्या भाविकांना सुभाष शिवनाथ आव्हाड शिक्षक व सुधाकरराव आश्रुबा आव्हाड मेजर यांचेकडून महाप्रसाद देण्यात आला
यावेळी या कार्यक्रमासाठी ह भ प गरीबदास महाराज पोहिगड, सभापती मा.गोकुळ भाऊ दौंड, मा. नगराध्यक्ष अभय काका आव्हाड ,नगरसेवक नंदकुमार शेळके, युवा नेते मारुती खेडकर, नाभिक संघटनेचे अध्यक्ष रामकिसन पंडित, मृदंगाचार्य शरद आव्हाड, संभाजी आव्हाड आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते
यावेळी जांभळी पंचक्रोशीतील व परिसरातील हजोरोच्या संख्येने भाविक भक्तगण सर्व ग्रामस्थ व भजनी मंडळ यावेळी उपस्थित होते