शेवगाव शहर व तालुक्यात नाशिक पदवीधर मतदान प्रक्रिया संथ गतीने पार पडली
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
शेवगाव शहर व तालुक्यात
नाशिक पदवीधर मतदान प्रक्रिया संत गतीने पार पडली
शेवगाव : शेवगाव शहर व तालुक्यात नाशिक पदविधर मतदान प्रक्रिया संथगतीने पार पडली सोमवार दि ३०/१/२०२२ रोजी शेवगांव शहर व तालुक्यात फक्त ४१.४३ टक्के मतदान झाले या मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही बहुतेक पदविधरांची मतदान यादित नांव न आल्याने मोठा पदविधर मतदारांचा हिरमोड झाला शेवगाव शहर व तालुक्यात ४,१४३ पैकी १,७२९ पदविधर मतदारांनी आपला हक्क बजावला सकाळी ८ वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाली व दुपारी ४ वाजता संपली सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अतिशय संथगतीने मतदान झाले दुपारी दोन नंतर मतदान केंद्रावर खुपगर्दी होती शेवगाव शहरात दोन मतदान केंद्र व चापडगाव,बोधेगाव,एरंडगाव,ढोरजळगाव,भातकुडगाव या ठीकाणी एक एक मतदान केंद्र होती शेवगाव मतदान केंद्रावर ॲड शिवाजीराव काकडे,प्रा चंद्रकांत कर्डक , वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई ,जि प सदस्य हर्षदाताई काकडे यांनी तसेच डॉक्टर , वकील, इंजीनियर ,प्राध्यापक व ईतर पदविधरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर भातकुडगाव मतदान केंद्रावर माजी आमदार नरेंद्र घुले, राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण मा आमदार चद्रंशेखर घुले जिल्हापरिषद अध्यक्ष राजश्री घुले,माजी सभापती क्षितीज घुले,प्रा संजय चव्हाण व ईतर पदविधरांनी आपला मतदाना चा हक्क बजावला शेवगाव शहरात ४०,२६ टक्के ,चापडगाव ४१,२८ टक्के, एरंडगाव ३२,७४ टक्के,तर भातकुडगाव या मतदान केंद्रांवर ४३,८४ टक्के मतदान झाले १५ उमेद्वारा मध्ये १४ अपक्ष व एकच उमेद्वार अधिकृत वंचित बहुजनआघाडी चे असल्याने मतदारांमध्ये सभ्रंम दिसुन आला महाविकास आघाडी नात्यागोत्यांचीच आहे मतदारांनी ओळखून घेतले