प्राचीन ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्र मोठ्या उस्ताहात साजरी
पैठण प्रतिनिधी
बबन उदावंत
प्राचीन ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्र मोठ्या उस्ताहात साजरी
पैठण : प्रतीष्ठानचे गोदाकाठी असलेले प्राचीन ग्रामदैवत, श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्र मोठ्या उस्ताहात साजरी करण्यात आली, महाशिवरात्र निमीत्ताने मंदीराला आकर्षित अशी लाईटींग कलर तसेच मंदीर सुरक्षेसाठी स्वयं सेवक त्यांच बरोबर महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले. महाशिवरात्र उस्तव यशस्वी पार पाडण्यासाठी मंदीर पुजारी कुणाल गुरव व राजु गुरव तसेच सर्व भक्त परीवाराणे आशिष पवार फौजदार जाधव, तात्या घेवारे, राम खंडागळे , दीनेश माळवे उमेश नरवजे मंगेंश पानपट, पाटेगाव चे काही तसेच पैठण चे मुले यांनी आहो राञ परीश्रम घेतले.
महाशिवरात्री निमित्त पैठण शहरातील सिद्धेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली असून, मंदिर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल पाटील नेहुल, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शना सह पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे , प्रल्हाद मुंडे पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकूल, स्वाती लहाने यांच्यासह विविध पोलीस कर्मचारी होमगार्ड जवान यांनी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला आहे,