School News शाळेत जाणाऱ्या मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंना कडक शिक्षा करणार-पोलीस निरीक्षक पुजारी…!
शाळेत जाणाऱ्या मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंना कडक शिक्षा करणार-पोलीस निरीक्षक पुजारी...!
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
शाळेत जाणाऱ्या मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंना कडक शिक्षा करणार-पोलीस निरीक्षक पुजारी…!
शेवगाव :शाळा व कॉलेजला येणाऱ्या मुलींच्या वाट्याला जाल छेड काढाल तर खबरदार मुलींना त्रास देणाऱ्या विद्यार्थांना व रोडरोमीयोंवर कडक शिक्षा करण्यात येईल असे प्रतिपादन शेवगांव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक विलास पुजारी यांनी बोलताना व्यक्त केले. शेवगाव तालुक्याच्या ढोरजळगांव येथील श्रीराम विद्यालयात विद्यार्थाना मार्गदर्शन करताना पुजारी बोलत होते.यावेळी पुजारी पुढे म्हणाले की मुला मुलींनी अँनरॉईड मोबाईल वापरणे बंद करावे सध्याच्या अधुनिक युगात नको त्या गोष्टी या मोबाईलमुळे घडत असुन आपल्या मुलांना पालकांनी मोबाईल देऊ नये.कुठल्याही चुकीला आपल्या पाल्याला पालकांनी पाठीशी न घालता त्वरीत शिक्षा केली तर एक चांगला पाल्य नागरीक घडु शकतो यासाठी जिध्द व चिकाटी असेल तर प्रतिकुल परीस्थितीतही विद्यार्थी प्रयत्न व अभ्यासाच्या जोरावर प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो यासाठी कॉपी न करता कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा घ्याव्यात. शाळेत कुठलेही वाईट कृत्य केल्यास कडक शासन करण्यात येईल. मुलींनी न घबारता न डगमता प्रतिकार केला,वेळीच आवाज उठविला तर अश्या घटना घडणार नाहीत कुठल्याही विद्यार्थाने किंवा रोडरोमिओने गैरवर्तन केल्यास त्याला कडक शासन केले जाईल असे पुजारी यांनी बोलताना सांगितले.शालेय वेळेत बाहेरगावाहुन विद्यालयात येणाऱ्या मुलींना रोडरोमिओंचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी शालेय दक्षात कमिटीची स्थापना यावेळी करण्यात आली असुन त्यामध्ये गांवातील प्रतिष्ठित व्यक्ती,तरूण,पालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राजेंद्र देशमुख,महादेव पाटेकर,आनंता ऊर्किडे, गणेश कराड, विद्यालयाचे प्राचार्य कांतेश्वर ढोले,पर्यवेक्षक सुनिल आव्हाड,बीट हवालदार रामेश्वर घुगे,संभाजी लांडे,बाळासाहेब पाटेकर, देवीदास देशमुख,देविदास गिऱ्हे, कैलास देशमुख,सूर्यकांत गाडगे, गणेश पाटेकर, संभाजी देशमुख,संभाजी फसले,पत्रकार दीपक खोसे,कमलाकर गरड,रोहन साबळे,कृष्णकांत पाटेकर,आकाश साबळे आदी उपस्थित होते.