सामाजिक

sant vaman bhau संत वामन भाऊ नगर येथे संत वामनभाऊ महाराज यांची ४७ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

वार्ताहर/संपादक
अशोक आव्हाड

संत वामन भाऊ नगर येथे संत वामनभाऊ महाराज यांची ४७ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाथर्डी येथील संत वामनभाऊ नगर मित्र मंडळ आयोजित संत वामनभाऊ महाराज यांची ४७ वी पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. या या पुण्यतिथीची प्रवचन सेवा भागवताचार्य ह.भ.प.वैभव महाराज माळवदे यांनी केली या प्रवचनामध्ये माळवदे महाराजांनी उपस्थित भावीक भक्तांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमासाठी शंकर महाराज मठाचे मठाधिपती प.पू.माधवबाबा , ह.भ.प. सुडके महाराज, ह.भ.प. जगन्ननाथ उबाळे महाराज, ह.भ.प. बालकृष्ण भालके महाराज हे संत वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथी साठी उपस्थित होते. प्रवचन झाल्यानंतर आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले

यावेळी संत वामनभाऊ नगर तरुण मंडळाचे अध्यक्ष सागरदादा गायकवाड यांनी गायकवाड परिवाराच्या वतीने ५,००००० रु भाऊ – बाबा मंदिर बांधकामासाठी देण्याची घोषणा केली.

ह.भ.प. माळवदे महाराज यांनी संत वामनभाऊ महाराज याचं जीवन चरित्र उलगडून भक्तांच्या जीवनात आलेले अनुभव सांगितले. त्यांनी सांगितले संत वामनभाऊ नगर ला भाऊ चा ऐतिहासिक वारसा लाभलेला असुन ही भूमी भाऊच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. त्यामुळेच संत वामन भाऊ नगर हे नाव देण्यात आले आहे भाऊ किर्तनासाठी पाथर्डी मध्ये आले की गायकवाड वाड्यात संत वामनभाऊ नगर मध्ये लिंबाच्या झाडाखाली उतरायचे. अशी ही पावन भूमी आहे.

या कार्यक्रमासाठी धनंजय बडे, रामप्रसाद आव्हाड,डाँ.मृत्यूजंय गर्जे ,भागवत पालवे,दत्तात्रय खेडकर, ज्ञानेश्वर उबाळे ,आण्णा गायकवाड, अँड.हरीहर गर्जे शिवव्याख्याते सचिन नागापुरे,रोहित पुंड,सुभाष भागवत, सागर शिंदे,संतोष तागड, तुकाराम ढाकणे , प्रकाश बोरुडे,उध्दव दौंड, शेळके सर,अशोक कराड,भूषण नागापुरे,दिपक बाफना,शेळके सर , उध्दव दौंड,विनायक घुले, ऋषीकेश गायकवाड,संदिप वायकर,आशिष शर्मा आदी स्वयंसेवक यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रास्ताविक रामप्रसाद आव्हाडसर यांनी केले तर सूत्रसंचालन सुभाष भागवत यांनी केले व आभार रोहित पुंड यांनी मांनले या पुण्यतिथी साठी तालुक्यातील व परिसरातील सर्व भाविक भक्त यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button