प. महाराष्ट्र

श्री संत एकनाथ महाराज नाथषष्ठी निमित्त नगरपरिषद पैठण तर्फे स्वच्छता मोहीम

पैठण प्रतिनिधी
बबन उदावंत

श्री संत एकनाथ महाराज नाथषष्ठी निमित्त नगरपरिषद पैठण तर्फे स्वच्छता मोहीम

पैठण :राज्यात सर्वात मोठा उत्सव हा नाथ षष्ठी उत्सव असलेल्या , नाथषष्ठी सोहळ्यास तेरा मार्च रोजी पासून सुरूवात होणार असून त्यासाठी नाले, रस्ते व गोदापात्रात असलेले ,घानकचरा हा व्यवस्थित साफ करून नाथषष्ठी साठी येणार्या, भाविकांसाठी मंडप उभारण्यासाठी गोदापात्रातील सपाटीकरण करण्यासाठी, नगरपरिषद पैठण हेसज्य झाले आहेत , यासाठी आज रोजी जिल्हापरिषद सदस्य विलास बाप्पु भुमरे यांच्या , हस्ते ट्रॅक्टर चे पुजन करून वाळवंट साफ करण्यासाठी सुरवात करण्यात आली आहे. दक्षिण काशीतील
श्री संत एकनाथ महाराज नाथ षष्ठी पैठण पूर्वतयारी स्वच्छता मोहीम नगरपरिषद पैठण तर्फे चालू करण्यात आली ,त्या अनुषंगाने माननीय श्री विलास बापू भुमरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले .

यावेळी प्रमुख उपस्थिती सोमनाथ दादा परदेशी,भूषण कावसणकर संतोष आगळे मुख्याधिकारी नगरपरिषद पैठण,किशोर चौधरी,नामदेव काका खराद,जालिंदर आडसूळ,गणेश मडके,जनार्दन मिटकर अमोल गोर्डे,कृष्णा मापारी, व आदींची उपस्थिती होती.

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button