वंचित बहुजन आघाडी कार्यालय शेवगाव येथे त्याग मुर्ती माता रमाई यांना अभिवादन
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
वंचित बहुजन आघाडी कार्यालय शेवगाव येथे त्याग मुर्ती माता रमाई यांना अभिवादन
मंगळवार दि ७/२/२०२३ रोजी त्याग मुर्ती माता रमाई यांना अभिवादन करून जयंती वंचित बहुजन आघाडी कार्यालय शेवगाव येथे साजरी करण्यात आली तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पित करून मानवंदना देण्यात आली माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पित करून जंयती प्रसंगी प्रा विजय हुसळे यांनी बुध्द वंदना सर्व उपस्थिता समवेत म्हटली या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण, तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, उपाध्यक्ष विशाल इंगळे, चर्मकार विकास संघाचे तालुका अध्यक्ष गोरख वाघमारे,सागर गरुड,भिमा गायकवाड,दिपक साळवे म्हसनजोगी समाज अध्यक्ष पोशाअण्णा कडमिंचे, माजी सरपंच शेख चांदभाई, संतोष गायकवाड भातकुडगाव, संतोष मोरे बालम टाकळी, नगर परिषद कामगार संघटना अध्यक्ष रमेश खरात, उपाध्यक्ष भानुदास गायकवाड़, बाबासाहेब साळवे,शेख सलीम जिलानी,अवि मातंग, जब्बार पठाण,राजुशेठ आहुजा प्रताप भालेराव, अरविंद साळवे, शेख राजूभाई व ईतर सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी प्रा किसन चव्हाण म्हणाले की यानतंर सर्व महापुरुष, संत यांचे उत्सव जयंती, पुण्यतिथी प्रा किसन चव्हाण यांचे सपंर्क कार्यालय शेवगाव महात्मा फुले भाजी मार्केट येथे साजरी करण्यात येईल तसेच येणार्या सर्व समाजातील तरुणांना आपल्या संत महापुरूषांचा इतिहासाची ओळख होवुन त्यांनी केलेले समाज कार्य अचरणात आणावे त्यांनी समाजासाठी दिलेले योगदानाबाबत माहीती मिळावी त्या संत महापुरुषांचा प्रसार प्रचार होण्याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल .