पैठण पंढरपूर मार्गात गेलेल्या शेत जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडी व शेतकऱ्यांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
पैठण पंढरपूर मार्गात गेलेल्या शेत जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडी व शेतकऱ्यांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित
बोधेगाव: पैठण पंढरपूर मार्गात गेलेल्या शेत जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडी व शेतकऱ्यांचे दिनांक 26/1/2023 चे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित राष्ट्रीय महामार्ग विभाग व प्रांताधिकारी यांनी लावली 7 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांची बैठक..
पैठण पंढरपूर मार्गात गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडी व शेतकऱ्यांनी बोधेगाव हातगाव फाटा येथे दिनांक 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता त्याला अनुसरून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग औरंगाबाद यांनी दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी प्रांताधिकारी कार्यालय पाथर्डी येथे शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील हरकती असतील तक्रारी असतील त्या संदर्भात सर्व विभागांना एकत्रित बोलावून बैठक लावलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी वर्ग आपल्या तक्रारी हरकती नोंदवणार आहेत. गेली पाच वर्षापासून पालखी मार्गाचे काम चालू असून शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्ता गेलेला आहे तरी त्यांना आजपर्यंत कोणताही मोबदला मिळालेला नाही. मोजणीची जी प्रक्रिया आहे ती चुकीची आहे शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय झालेला आहे. संबंधित कंपनी व राष्ट्रीय महामार्ग यांनी शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पाठपुरावा करत आहे तरी शेतकरी वर्गाने पूर्ण ताकदीनिशी व प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनात लढा द्यायचा आहे. लवकरच शेतकऱ्यांना न्याय मिळणार असे चित्र तयार होत आहे तरी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी जास्त ताकतीने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या हरकती तक्रारी घेऊन प्रांताधिकारी कार्यालय पाथर्डी येथे हजर राहायचे आहे.
माहितीसाठी, बन्नू भाई शेख, वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष अहमदनगर दक्षिण,
संगीता ताई ढवळे, महिला अध्यक्ष शेवगाव तालुका यांच्याशी संपर्क साधावा.