प्रा. किसन चव्हाण सर यांचा एकच कॉल MECB प्रशासन लागले कामाला
प्रतिनिधी संतोष कुलकर्णी
प्रा. किसन चव्हाण सर यांचा एकच कॉल MECB प्रशासन लागले कामाला
पाथर्डी(प्रतिनिधी)- पाडळी ता पाथर्डी येथे इंदिरानगर नावाची मोठी दलित वस्ती आहे या दलित वस्ती मध्ये जाणीवपूर्वक mecb प्रशासनाने कारवाई करत तेथील वीजपुरवठा खंडित केला आहे १०/१२ दिवसा पासुन हि वस्ती अंधारात आहे विषेश बाब म्हणजे तेथील लोकांनी अधिकृत कोटेशन घेतले आहेत तरी देखील तेथील विज पुरवठा पूर्ववत करण्यात आला नाही स्थानिक लोकांनी सबंधित अधिकाऱ्याला विचारले असता आमच्याकडे वायर शिल्लक नाही व मीटर देखील शिल्लक नाही तुम्हीं ते स्व खर्चातुन विकत घ्या अशा पद्धतीची भाषा ते लोकांना वापरत आहेत यामधून लोकांची आर्थिक पिळवणूक करण्याचे काम व त्रास देण्याचे काम चालु आहे. स्थानिकांच्या सहनशील तेचा अंत झाल्यानंतर काही स्थानिक लोकांनी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण सर यांना झालेल्या प्रकराबद्दल त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर माहिती दिली तात्काळ प्रा किसन चव्हाण सर यांनी ठाकूर नामक अधिकाऱ्या बरोबर फोन द्वारे संपर्क साधला व त्यांना सांगितले की लोकांनी अधिकृतपने मीटरचे पैसे अदा केले आहेत वास्तविक पाहत दोन दिवसात तेथील वीजपुरवठा पूर्ववत करणे आवश्यक होते परंतु आज १०/१२ दिवस पूर्ण होऊन देखील तेथील वस्ती अंधारात आहे हा प्रकार योग्य नाही यावर पुढील एक दिवसात तेथील वीजपुरवठा सुरळीत करून द्या असा इशारा प्रा किसन चव्हाण सर यांनी दिला त्याचबरोबर कोणतेही अनाधिकृत पैसे लोकांकडून घेऊ नका यावर ठाकूर नामक अभियंता म्हणाला की उद्या संध्या काळ पर्यंत सर्वांचे मीटर जोडुन देतो असे त्यांनी सांगितले