प. महाराष्ट्र
प्रा.दौंड क्लासेस येथे शिव जयंती व एच एस सी निरोप समारंभ संपन्न
वार्ताहर संपादक
अशोक आव्हाड
प्रा.दौंड क्लासेस येथे शिव जयंती व एच एस सी निरोप समारंभ संपन्न
खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील प्रा.दौंड क्लासेस येथे शिवजयंती उत्सव व एच एस सी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रथम शिवाजी महाराजांच्या व भगवान बाबाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी STI सागर अंदुरे हे होते या निरोप समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी या कार्यक्रमासाठी STI सागर अंदुरे, दौंड क्लासेसचे अनिल दौंड सर ,संत भगवान बाबा कॉम्प्युटरचे सतिश शिरसाट, पत्रकार अशोक आव्हाड, ढाकणे सर आदि मान्यवर व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री केळगंद्रे यांनी केले तर प्राची पाठक यांनी आभार मानले