पाथर्डी शहरातील सोन्याचांदीचे व्यापारी चिंतामणी यांच्यावर खुनी हल्ला
पाथर्डी शहरातील सोन्याचांदीचे व्यापारी चिंतामणी यांच्यावर खुनी हल्ला
पाथर्डी शहरातील नवी पेठेतील सोन्या चांदीचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी हे नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून आनंदनगर येथे घरी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर शेवगाव रोडवर खुनी हल्ला करून पसार झाले आहेत.चिंतामणी यांना गंभीर इजा झाली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहे.दरम्यान या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून उपजिल्हारुग्णालयात शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सध्या पाथर्डी मध्ये असे चोरीच्या घटना घडत असून व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या हल्ल्यामध्ये चिंतामणी अतिशय गंभीर जखमी झालेले असून अहमदनगर रुग्णालय या ठिकाणी उपचार चालू आहे. तरी पाथर्डी मध्ये अशा घटना वारंवार घडत असून प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पाथर्डी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे