इतरप. महाराष्ट्र

पाथर्डी तालुक्यातील येळी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय सुंदर ग्राम पुरस्कार जाहीर

वार्ताहर /संपादक अशोक आव्हाड

पाथर्डी तालुक्यातील येळी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय सुंदर ग्राम पुरस्कार जाहीर

पाथर्डी- पाथर्डी तालुक्यातील येळी ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा तालुकास्तरीय आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व जिल्ह्या भरातून येळी ग्रामस्थ वर अभिनंदन असा होत आहे या पुरस्कारामध्ये 10 लाख रुपये व सन्मान चिन्ह अशा पुरस्काराचे स्वरूप असून अहमदनगर जिल्ह्यातील चित्रही तालुक्यातील गावांना हा पुरस्कार मिळाला असून यामध्ये तालुका कोपरगाव व थेरगाव व कर्जत अशा दोन ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक विभागुन पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वीरगाव तसेच संगमनेर तालुक्यातील वेलहाळे, राहता तालुक्यातील बाभळेश्वर, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक व उंदीर गाव यांना विभागून राहुरी तालुक्यातील तांदूळनेर, नेवासे तालुक्यातील खुपटी , शेवगाव तालुक्यातील वडूले बुद्रुक , जामखेड तालुक्यातील मोहरी , श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव , पारनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक, नगर तालुक्यातील कोळेवाडी या ग्रामपंचायतीने देखील तालुकास्तरी सुंदर ग्राम पुरस्कार घोषित झाला आहे तो लवकरच प्रदान करण्यात येईल

ग्रामविकास विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतात आर आर पाटील (आबा) सुंदर गाव पुरस्कार योजना म्हणून राबवली जाते आर आर पाटील यांनी राज्यात ग्राम स्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू करून त्या प्रभावीपणे राबविल्या माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे त्यांच्या स्मरणार्थ चांगले काम करणाऱ्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचे वितरण दरवर्षी आर आर पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरावर संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा जिल्ह्यातील मंत्री किंवा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रदान केले जाते

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button