अखेर त्या सावकाराला सद्बुद्धी सुचली शेतकऱ्याची परत केली जमीन
पैठण प्रतिनिधी
बबन उदावंत
अखेर त्या सावकाराला सद्बुद्धी सुचली शेतकऱ्याची परत केली जमीन
शेवगाव : आज खूप मनस्वी आनंद आणि समाधान वाटतंय गेल्या 4 फेब्रुवारी 2023 रोजी शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील बाबासाहेब गुंजाळ नावाचे अल्पभूधारक शेतकरी सगळी कडेचे दरवाजे ठोटाऊन शेवटचा आशेचा किरण म्हणून माझ्याकडे आले सावकाराने केलेले शोषण दारातून हाकलून दिलेली वागणूक ही सगळी सगळी व्यथा मला सांगितली माज्या मुलीच्या लग्नात गहाण ठेवलेली 1 लाखासाठी जमीन नाही मिळाली तर आम्हला आत्महत्येशिवाय पर्याय नाही हे शब्द ऐकून मी त्यांना धीर दिला काळजी करू नका असा काही वेडावाकडा निर्णय घेऊ नका मी सोबत आहे आणि जमीन मिळेपर्यंत सोबत राहील मग तो सावकार कितीही मोठा असू द्या त्यांना धीर आला आणि ते बापलेक मोठ्या आशेने घरी परतले मी तास दोन तासात सोशल मीडियावर या संदर्भातली पोस्ट टाकली आणि या पोस्ट मध्ये शेवटी सावकाराचे नाव न टाकता फक्त सावकाराला सद्बुद्धी सुचो आणि शेतकऱ्याची जमीन परत करो असेही लिहिले आणि सावकाराने दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या प्राध्यापक किसन चव्हाण व गावातील पदाधिकारी यांच्या बरोबर बैठक करून कृपया विषय वाढू नका मी जमीन देण्यास तयार आहे आणि दुसऱ्याच दिवशी विषय संपला पण त्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये जमवायला 10 दिवस लागले आणि आज त्याची जमीन सावकाराने खरेदी खत करून त्याला परत केली दोघेही बापलेक आज संध्याकाळी पेढे घेऊन घरी आले दोघेही अक्षरशः रडत होते आभार मानत होते त्यांनी मला पेढे दिले पण मी त्या बापलेकाकाच्याच तोंडात पेढे भरवले का तर माझं ऐकलं आणि आत्महत्येसारखा कुटुंबाला संपवणारा वेडावाकडा निर्णय घेतला नाही असला निर्णय कोणीही घेऊ नये माझी हात जोडून विनंती आहे शेवटी कोणत्याही प्रश्नाला उत्तर असतेच फक्त वेळ लागतो मी आभार मानले त्या सावकार मित्राचे त्याचीही पोस्ट वाचून संवेदनशीलता जागी झाली सद्बुद्धी सुचली आणि व्याजाच्या मोहाला अंगावर पाल पडावी आणि ती पटकन झटकून टाकावी तशी त्यांनीही व्याजाची पाल रात्रीतून झटकून टाकली आणि आज त्या विषयाला पूर्णविराम दिला शेतकरी ,सावकार आणि माझे बोधेगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे बिन्नीचे सहकारी सगळ्यांना धन्यवाद मानले.