तुळजवाडी येथील मेजर पांडुरंग गिन्यानदेव ढोले यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
वार्ताहर /संपादक
अशोक आव्हाड
तुळजवाडी येथील मेजर पांडुरंग गिन्यानदेव ढोले यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
खरवंडी कासार पाथर्डी तालुक्यातील तुळजवाडी येथील तुळजवाडीतील प्रथम मेजर श्री पांडुरंग गिन्यानदेव ढोले यांचा सेवापूर्ती सोहळा अगदी आनंदामध्ये व उत्साह मध्ये पार पडला प्रथम दुपारी 3 वाजता खरवंडी कासार येथील हनुमान मंदिरापासून पांडुरंग ढोले मेजर यांची ढोल ताशाच्या गजरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मेन पेठेतून ही मिरवणूक काढण्यात आली यावेळी खरवंडी कासार पेठेतील व्यापाऱ्यांनी ढोले मेजर यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सुमारे दोन ते तीन तास ही मिरवणूक चालली होती या मिरवणुकीमध्ये भारत माता की जय जय जवान जय किसान अशा घोषणा देत ही मिरवणूक तुळजवाडी कडे रवाना झाली त्यानंतर भूमिपुत्र पांडुरंग ढोले मेजर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन तुळजवाडी ग्रामस्थांनी मोठ्या थाटात तुळजवाडी संस्थान या ठिकाणी केले या कार्यक्रमासाठी खरवंडी परिसरातील हजारोच्या संख्येने सेवानिवृत्त मेजर ,नागरिक व महिला यावेळी उपस्थित होते
पांडुरंग मेजर विषयी सांगायचे झाले तर
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आर्शिवाद पाठीशी घेऊन अखंड २१ वर्षे राष्ट्रभक्तीने प्रेरीत होऊन अहोरात्र कर्तव्य पार पाडुन देशसेवा पुर्ण केली.
वेळोवेळी आपले मार्गदर्शन, विचार तथा अनुभव विविध प्रकारे विकासासाठी तुळजवाडीकरांना उपयुक्त ठरले.
श्री क्षेत्र तुळजाभवानी संस्थान तुळजवाडी निर्मितीकरता प्रसंगी कठीन निर्णय घेऊन योगदान देऊन आधारस्तंभ म्हणुन महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
संस्थानच्या इतिहासात सोनेरी अक्षरानीं नोंद व्हावी अशा प्रकारचे बहुमोल सामाजिक व धार्मिक कार्य त्यांनी केले
देवादिकांच्या , साधुसंतांच्या आर्शिवादाने देव , देश आणि धर्म रक्षणाचे पवित्र कार्य केले.
युवकांचा आदर्श मित्र ,
अनेकांचा विशेष सल्लागार , गावकर्यांचा सौजन्यशील दुत,भारतमातेचा निष्ठावान सैनिक आशा
या भुमिपुत्राच्या कार्याला सलाम करत तुळजवाडी ग्रामस्थांनी यशोचित असा सन्मान करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ह भ प रामगिरी महाराज व ह भ प संतोष महाराज खताळ यांनी ढोले मेजर यांचा फेटा शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले . व यापुढे देशाची समाजाची धर्माची सेवा आपल्या हातून घडो असा आशीर्वाद यावेळी दिला.ढोले मेजर यांचा सेवापुर्तीचा सोहळा पौर्णिमेच्या दिवशी आल्याने तुळजवाडी संस्थांनवरती तुळजाभवानी मातेच्या सपत्नीक आरती करण्याचा योग आला आरती झाल्यानंतर आलेल्या सर्व ग्रामस्थ व भाविकांना ढोले मेजर यांच्याकडून महाप्रसादही देण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमामुळे तुळजाभवानी संस्थान गजबजून गेले होते यावेळी अनेक मान्यवरांनी ढोले मेजर यांच्या विषयी मनोगत व्यक्त केली
या कार्यक्रमासाठी येळेश्वर संस्थांचे ह भ प रामगिरी महाराज, तुळजवाडी संस्थांनचे संतोष खताळ महाराज, प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर, पप्पू गोल्हार मेजर, मेजर विश्वास शेळके, पोलीस बंडू ढोले, पोलीस बबन ढोले, मेजर शिवाजी ढोले, सुधीर कोळपकर, अशोक गरजे, बाप्पा ढोले, अशोकराव जगताप, शरद कोळपकर, आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते