शेवगाव प्रतिनिधी संतोष चिंतामणी
पैठण बाहेरील नाथ मंदिर पार्किंग परीसरात अज्ञात प्रेत आढळून आले
नाथ मंदिर परिसरात अज्ञात पुरुष जातीचे पैठण पोलीस स्टेशन हद्दीत, बाहेरील नाथ मंदिर परिसरामधील पार्किंग येथे एक वयोवृद्ध पुरुष जातीचे प्रेत आढळून आले आहे ओळख अद्याप पटलेली नाही. या व्यक्तीचे वय अंदाजे 60 ते 70 असे , सांगण्यात आले असून बेशुद्ध अवस्थेत मिळाले आहे. प्रेताच्या अंगावर विटकरी रंगाचे स्वेटर , अंगावर लाल गुलाबी रंगाचे बेडशीट अंगावर व एका हातात भगव्या रंगाचा दोरा व दुसऱ्या हातात कळ्या रंगाची घड्याळ असून त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. सदरील व्यक्तीस कोणी ओळखत असेल किंवा कुठली व्यक्ती बेपत्ता असल्यास कृपया पैठण पोलीस स्टेशनची संपर्क साधावा पैठण पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे पोलीस ठाणे पैठण हे पुढील तपास करीत असून पोलीस उपनिरीक्षक एस एस भोसले व पोलीस कॉन्स्टेबल एस बी दिलवाले हे पुढील तपास करत आहे.