नवनिर्वाचित ओबीसी सरपंच व सदस्यांचा डॉ. नारायणराव मुंडे यांच्या हस्ते सत्कार संपन्न.
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
नवनिर्वाचित ओबीसी सरपंच व सदस्यांचा डॉ. नारायणराव मुंडे यांच्या हस्ते सत्कार संपन्न.
गेवराई : सोमवार दि. १३. २. २०२३ रोजी या दिवशी महात्मा फुले विद्यालय भगवान नगर गेवराई येथे ओबीसीची ज्येष्ठ नेते भारतातील पहिल्या मंडळ स्तंभाचे जनक माननीय आमदार डॉ. श्री नारायणराव मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील नवनिर्वाचित ओबीसी सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात सरपंच व सदस्यांना ओबीसी आरक्षणामुळे मिळालेल्या पदाची जाणीव करून दिली व मंडळ आयोगामुळे मिळालेल्या आरक्षण व त्यामुळे गरीब वंचित ऊसतोड समाजांना मिळालेली राजकीय संधी याबद्दल योग्य मार्गदर्शन करण्यात आली तसेच ओबीसीचे 27 टक्के आरक्षण अबाधित राखण्यासाठी व त्याची संपूर्ण अंमलबजावणी कशी करावी याबद्दल डॉ. मुंडे साहेब यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक करताना श्री परमेश्वर(महाराज )वाघमोडे राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष बीड यांनी गेवराई तालुक्याची पुढील वाटचाल ही ओबीसीच्या नेत्यांना विचारात घेतल्याशिवाय होणार नाही अशी भूमिका मांडली यावेळी गेवराई तालुक्यातील नवनिर्वाचित बहुसंख्य सरपंच व सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते सदरील सत्कार समारंभ नंतर आयोजित स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला ओबीसी नवनिर्वाचित सरपंच सदस्यांचा सत्कार संयोजन समिती श्री सुघोष मुंडे सचिव भगवान शिक्षण प्रसारक मंडळ गेवराई जिल्हा बीड श्री मुंडे डी आर श्री श्रीमंत तेरे सलमान सय्यद श्री राठोड श्री राऊत श्री क्षीरसागर शिरीष मुंडे श्री पंडित यांच्यासह तालुक्यातील ओबीसीचे बहुसंख्य कार्यकर्ते महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील मुंडे यांनी केले