नागेबाबा परिवारातर्फे मोफत तपासणी शिबिर संपन्न
वार्ताहर /संपादक
अशोक आव्हाड
नागेबाबा परिवारातर्फे मोफत तपासणी शिबिर संपन्न
खरवंडी कासार पाथर्डी तालुक्यातील नागेबाबा मल्टीस्टेट खरवंडी कासार च्या वतीने साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स अँड मेडिकल असोसिएशन खरवंडी कासार यांच्यावतीने मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी प्रथम दीपप्रज्वलन करून या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रतिष्ठित व्यापारी प्रकाश शेठ कटारिया हे होते या शिबिरामध्ये मधुमेह ,टीबी, हाडाची, एसीजी इत्यादी आजारावरती तपासणी करण्यात आले यावेळी आरोग्य तपासणी मध्ये 200 ते 250 नागरिकांनी आपल्या तपासण्या करून घेतल्या या तपासणीमध्ये ज्यांना ज्या आजारावर काही त्रास जाणवला त्यांना साई माऊली सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मधील डॉक्टर्सनी पुढील सल्ला देऊन औषध उपचार घेण्यास सांगितले यावेळी बोलताना डॉ. ज्ञानेश्वर दराडे म्हणाले नागेवाबा परिवाराने नेहमीच सामाजोपयोगी कार्यक्रम संवेदनशीलता जपले आहे यापुढे काळातील भगवानगड परिसरात विशेषतः ऊस तोडणी कामगारांच्या आरोग्यासाठी सहाय्यभूत कार्य करण्यासाठी नागेबाबा परिवारासह देवनाथ फाउंडेशन हक्काने अग्रेसर राहील असे प्रतिपादन डॉ. दराडे यांनी यावेळी केले
यावेळी अहमदनगर येथील या आरोग्य शिबिरासाठी डॉ. जितेंद्र ढवळे, डॉ. गणेश मिसाळ, डॉ.पंकज वर्पे यांनी आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली
यावेळी खरवंडी कासार येथील प्रतिष्ठित व्यापारी प्रकाश शेठ कटारिया, डॉ. एस एम देशमुख, डॉ. अरविंद हुद्देदार, डॉ, ज्ञानेश्वर दराडे, डॉ. संदीप कराड, धारकर सराफ ,सरपंच प्रदीप पाटील, प्रतिष्ठित व्यापारी रामनाथ दादा खेडकर, लहू दराडे, मुक्ताबाई खेडकर, ग्रा. सदस्य भाऊसाहेब सांगळे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते
यावेळी नागेबाबा मित्रपरिवारांमधील रिजनल ऑफिसर यशवंत मिसाळ, पोपट जामधडे, प्रवीण गायकवाड, प्रोग्रॅम डिपार्टमेंट हेड संकेत वारकड, मॅनेजर प्रभाकर गोल्हार, चेतन नवसुपे, हरीश वाघमारे, विशाल शिरसाट, नामदेव खेडकर सर्व कर्मचारी वृंद या आरोग्य शिबिरासाठी खरवंडी कासार परिसरातील नागरिक उपस्थित होते