जि. प. च्या मिडसांगवी शाळेत अवतरली ‘शिवसृष्टी’ !
वार्ताहर/ संपादक
अशोक आव्हाड
जि. प. च्या मिडसांगवी शाळेत अवतरली ‘शिवसृष्टी’ !
खरवंडी कासार –
जि. प. प्राथमिक शाळा मिडसांगवी येथे ‘शिवसृष्टीची’ निर्मिती करण्यात आली आहे. शिवजयंतीच्या दिवशी सरपंच भगवान भाऊ हजारे यांच्या हस्ते ‘शिवसृष्टीचे’ फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शत्रुघ्न जाधव हे होते. ‘ शिवसृष्टी,’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य तैलचित्र भिंतीवर रेखाटले असून जाळीचे कुंपण केलेले आहे. शोभिवंत झाडांचे रोपण केलेले असून घोड्यावर स्वार शिवरायांच्या तैलचित्रावर रंगीत विजेच्या दिव्यांची योजना केलेली आहे .रात्री रंगीत प्रकाश योजनेमुळे विलोभनीय दृश्य दिसते. मिडसांगवी गावामध्ये ‘शिवसृष्टी’ मुळे नवा सेल्फी पॉईंट अवतरल्याचे जाणवत आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमातील शिवरायांचा संपूर्ण इतिहास वक्तृत्व मालेतून साकारण्यात आला. पाठ्यपुस्तकातील अठरा पाठांवर अधारीत अठरा विद्यार्थ्यांची मनोगते सादर झाली. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाने उपस्थितांची मने जिंकली. रंगीबेरंगी आकर्षक फुलांची सजावट तसेच रांगोळी काढण्यात आली होती. शिवसृष्टी अंतर्गत शिवरायांच्या जीवन कार्यावरील विविध पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. शिवरायांच्या विचारांचा प्रसार व्हावा, भविष्यात बालवक्त्यांतून शिवव्याख्याते घडावेत असा उद्देश ‘शिवसृष्टी’ निर्मितीमागे असल्याचे मुख्याध्यापक बाळासाहेब घोंगडे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास सरपंच भगवान हजारे,उपसरपंच विष्णू थोरात, माजी सरपंच दत्तात्रय पठाडे, अनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य शौकत शेख, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र मुळे, राम पठाडे, महेश हजारे, अमोल पठाडे, सुनील हजारे, दिनेश पठाडे, अशोक घोंगडे, गणेश हजारे, महादेव सुळ,ग्रामसेवक आंधळे भाऊसाहेब, अमोल गुंजकर, दिनकर पठाडे,राजू जाधव,हशूभाई शेख, रणजित गायकवाड, भीमराज घोंगडे, सुनील केदारे, सोपान शिंदे,शरद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब घोंगडे यांनी केले. सूत्रसंचलन व्यंगचित्रकार दीपक महाले यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर वाघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण कराड, बंकट बडे, वाल्मीक बडे, धर्मप्रसाद जोशी, मनीषा आंधळे यांनी परिश्रम घेतले.