प. महाराष्ट्र

वधूवर मेळावे घेण्याची काळाची गरज – मधुकरराव मैड

शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी

वधूवर मेळावे घेण्याची काळाची गरज – मधुकरराव मैड

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेच्या माध्यमातून 26 मार्च रविवार रोजी .श्रीरामपूर तालुक्यातील खोकर फाटा ,सबस्टेशन समोर, अन्नपुर्णा मंगलकार्यालय येथे भव्य राज्यव्यापी सोनार समाजाचा वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.त्यानिमित्ताने औरंगाबाद जिल्हातील लाडगाव श्रीदत्त डिगंबर पीठ या ठिकाणी मिटींग आयोजित करण्यात आली होती.अध्यक्ष स्थानी महामंडलेश्वर श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ होते.
प्रारंभी संत शिरोमणी नरहरीमहाराज यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, समाजाचे नेते श्री.मधुकरराव मैड म्हणाले कि सोनार समाजात मुलामुलींचे लग्न जमणे अतिशय गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मुले व मुली भरपूर आहेत पण आजकाल मुलींच्या अपेक्षामध्ये,खुपच वाढल्याने मनपसंत सोयरीक मिळणे कठीण झाले आहे.
तरी आईवडील यांनी आपल्या मुलीला आयुष्यभर सुखासमाधानात कसे जीवन जगता येईल.तिला काही आयुष्यात अडचणी येणार नाही याकरिता लग्न जमविताना चांगल्या जुन्याजाणत्या घरातील व्यक्तिंवर विश्वास ठेवून संस्कार, आपलेपणा,प्रेमळ,कर्तबगार मुलांची निवड करून मुलींना समजून सांगणे आवश्यक आहे.याकरिता वेळ ,पैसा,वाचवून सामुदायिक विवाहमधे लग्न करणे काळाची गरज आहे असे.सांगितले.
संघटनेचे प्रमुख सूत्रधार श्री.गोविंददादा अंबिलवादे यांनी सांगितले कि वधूवर मेळाव्यात आपले उपवर मुलेमुली जास्तीत जास्त संख्येने आणुन समाजातील बंधुभगिनी यांनी समाजहितासाठी सहकार्य करावे .संघटनेच्या पदाधिकारी यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी तळागाळातील समाजबांधव यांच्यापर्यन्त जाऊन संघटनेची भुमिका समजून सांगुन मेळाव्याचे आदरयुक्त पणे निमंत्रण देऊन मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करावे असे म्हणाले.
यावेळेस अध्यक्षीय भाषणात महंत महामंडलेश्वर श्री.दत्तात्रय महाराज दहिवाळ म्हणाले कि संघटनेच्या माध्यमातून होणारा वधूवर मेळावा हा न भुतो न भविष्यती होण्यासाठी समाजाची जबाबदारी आहे.संघटना माध्यम आहे.पण मुलं मुली आणणे यांची जबाबदारी समाजाची आहे. मेळाव्यात किमान पंच्चवीस जोडवे यांचे लग्न लागतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. संघटनेच्या मेळाव्यात मुलामुलींना सर्व संसार उपयोगी साहित्य, कपडे,चप्पल, बूट,मंगळसुत्र, पट्या, जोडेविरूदे ,सर्व मोफत देण्यात येणार आहे. तरी यासंधीचा सर्व सोनार समाजबांधवांनी समाजहितासाठी विचार करून मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहकार्य करावे असे सांगितले.
यावेळेस श्री.मधुकरराव टाक,नंदुशेठ राजुरकर, राजुशेठ बागडे, सोपानराव मुंडलिक, प्रशांत कुलथेसर यांनी मार्गदर्शन व वधूवर मेळाव्याच्या दुस्टीने मोलाच्या सुचना केल्या.
यावेळेस उपस्थित मान्यवर यांचा संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष श्री. सत्यनारायण उदावंत व संघटनेचे कार्याध्यक्ष रमेशशेठ भिवंडीकर यांनी सत्कार केला.
यावेळेस सुनिलशेठ गोलटगावकर, मिलींदशेठ कपोते, राहुल दहिवाळ तसेच समाजातील अनेक मान्यवर महिलाभगिनी उपस्थित होते.
मिटींग सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक कोपरगाव येथील श्री.विजयशेठ भडकवाडे यांनी केले.

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण वाचा
Close
Back to top button