प. महाराष्ट्र

मढी देवस्थान समितीच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे व  गाव पातळीवरील सेवाभावी कार्य करनाऱ्या सर्व धर्मीय अकरा व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले

वार्ताहर/ संपादक
अशोक आव्हाड

मढी देवस्थान समितीच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे व गाव पातळीवरील सेवाभावी कार्य करनाऱ्या सर्व धर्मीय अकरा व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले

पाथर्डी .आमदार मोनिका राजळे यांचे गेल्या आठ-दहा वर्षातील कार्य विकास कामाचा मानबिंदू ठरत असून राज्यासह जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे . राजळेंचे नेतृत्व ,शांत ,संयमी व विकासाची दृष्टी असलेली असून तालुक्याने अशा नेतृत्वामागे ताकद उभी करण्याचे आव्हान मढी देवस्थान समितीचे अध्यक्ष बबन तात्या मरकड यांनी केली .कानिफनाथ भक्त मंडळ, मढी ग्रामस्थांच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .यावेळी तालुक्यातील नेते कार्यकर्त्यांसह भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर , वृद्धेश्वरचे संचालक सुभाष ताठे , बाळासाहेब गोल्हार , नितीन एडके, प्रशांत शेळके, प्रसाद आव्हाड ,माजी सरपंच भगवान मरकड कानिफनाथ देवस्थानच्या सचिव विमलताई मरकड कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त डॉ . विलास मढीकर , रवींद्र आरोळे , शामराव मरकड ,नवनाथ मरकड आदी उपस्थित होते .राज्यस्तरीय भाविक मंडळाकडून आमदार राजळे यांना अत्यंत मानाचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविल्यानंतर श्रीगोंदा ,शेवगाव ,नगर पाथर्डीतील समर्थकांनी राजळेचा कार्यक्रमास्थळी गौरव केला .

यावेळी बोलताना माजी अध्यक्ष नवनाथ मरकड म्हणाले राजळे कुटुंब तालुक्याची मोठी राजकीय शक्ती असून आगामी मंत्री मंडळ विस्तारात आमदार मोनिका राजळे यांना स्थान मिळावे यासाठी पक्षश्रेष्ठीकडे शिष्टमंडळ नेण्यात येईल .तालुक्याचा विकासात आमदार राजळे यांचे योगदान लक्ष विधी आहे . मढी देवस्थानसह तालुक्यातील सर्वच तीर्थक्षेत्रांना भरविनिधी मिळून देऊ विकासाची मुहूर्तमेढ रोवली .संपूर्ण तालुका आमदार राजळे यांच्या नेतृत्वाकडे मोठ्या आशेने पाहत असून राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने संपूर्ण तालुक्याची प्रतिष्ठा वाढली आहे . केंद्र व राज्य सरकरमध्ये असलेल्या वजन वापरून आमदारांनी धार्मिक पर्यटनावर लक्ष केंद्रित करून रोजगार निर्मितीला हातभार लावावा .यावेळी बोलताना आमदार राजळे म्हणाल्या राजकीय कारकीर्दीतील जीवनगौरव पुरस्कार प्रथमच मिळाल्याने आपली जबाबदारी वाढली आहे .पुरस्कार मिळण्या ऐवढे कार्य केले नाही . मात्र राज्यातील नाथ भक्ताकडून होणारे कौतुक संपूर्ण मतदारांचा मोठेपणा वाढवणारे ठरले आहे . विकास कामात प्रेरणा व पाडबळ मिळण्यासाठी कानिफनाथांच्या आशीर्वाद समजून हा पुरस्कार आपण संपूर्ण मतदारसंघ कार्यकर्ते व मनापासून साथ देणाऱ्या विकास दुताना अर्पण करीत आहोत .कार्यक्रमाची प्रास्ताविक माजी सरपंच भगवान मरकड सूत्रसंचालन डॉ . विलास मढीकर तर आभार रवीद्र अरोळे यांनी मांनले

पाथर्डी तालुका नाथसंप्रदायाची जन्मभूमी असून मढी येथील कानिफनाथांची यात्रा सुमारे महिनाभर चालते . गुढीपाडव्याच्या महापूजेला मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री , ग्रामविकास मंत्री , तथा पालकमंत्री यांना उपस्थित राहण्याच्या दृष्टीने आगामी अधिवेशनात भेटून विनंती करू . अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली .

श्री क्षेत्र मढी येथील यात्रा भट्टीचा म्हणजे होळीचा सणाला पंधरा दिवसा अगोदर सुरू होते . देवस्थान समितीच्या वतीने यंदापासून गाव पातळीवरील सेवाभावी कार्य करनाऱ्या सर्व धर्मीय अकरा व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले . यात्रेचा पहिला दिवसाचा प्रारंभ पुरस्कार वितरण सोहळ्याने झाला .अध्यक्ष स्थानी माजी सरपंच भगवान मरकड तर प्रमुख पाहुणे म्हणून देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड , सचिव विमलताई मरकड , कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड ,विश्वस्त डॉ . विलास मढीकर , रवींद्र आरोळे ,शामराव मरकड ,ग्रामपंचायत सदस्य पोपट घोरपडे जनार्दन मरकड ,चंद्रभान पाखरे गणेश मरकड सोसायटीचे विष्णू मरकड शंकर पाखरे
आदी मान्यवर उपस्थित होते .गावातील नाथ संप्रदायाच्या अभ्यासाक अशोक महाराज मरकड , बाबासाहेब महाराज मरकड , द्वारकाबाई मरकड अंबादास मरकड ,शब्बीर शेख ,रामकिसन मरकड पोपट महाराज मरकड ,मंदाबाई पाखरे ,बबन मरकड ,विनायक आरोळे,आयुब शेख यांना आमदारांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .गावत प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने सर्व थरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी बोलताना आमदार राजळे म्हणाले गाव पातळीवर सतकार्य करत सामाजिक सलोखा प्रबोधन कार्य करणाऱ्या व्यक्तींना गावानेचे सन्मानित करण्याने चांगले काम करणाऱ्याला अधिक प्रोत्साहन मिळते .

सद्य परिस्थितीत गावो गावाची विभागणी विविध गटातटामध्ये विभागली जाऊन विकास कामाची गती खुंटते .त्या पार्श्वभूमी मढी गावचे उदाहरण तालुक्यासाठी आदर्श ठरावे . राजीव राजळे मित्र मंडळ , कानिफनाथ सेवा मंडळ , ग्रामस्थांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या कार्यक्र सर्वासाठी प्रेरणादायी आहे .नाथ संप्रदायाची जन्मभूमी म्हणून तालुक्याकडे पहिली जाते .देशाला तालुक्याची ओळख नाथ संप्रदायिक दिली आहे . शासनाच्या विविध योजनांमधून यापूर्वी भरून निधी देवस्थानला मिळाला . राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा करून यात्रा कालावधीत नवनवीन उपक्रम देवस्थान समितीच्या पुढाकाराने राबविले जातील .गाव पातळीवर सर्वमान्य व्यक्तीचा गौरव समारंभ आयोजित करण्याचा मढी पॅटर्न मतदारसंघात राबवू . देवस्थान समितीने वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याने गावाचे मोठेपण वाढले आहे . आर्थिक प्रगती देवस्थानचे माध्यम तालुक्यासाठी प्रभावी ठरणार असल्याने धार्मिक पर्यटनाचा एक कलमी कार्यक्रम मतदार संघात राबवू . कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन तात्या मरकड उपक्रमाची माहिती नवनाथ मरकड यांनी दिली तर आभार रवींद्र आरोळे यांनी मानले .

 

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button