kharwandi-kasar खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन अॅड प्रताप ढाकणे यांच्या हस्ते संपन्न
वार्ताहर /संपादक अशोक आव्हाड
खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन अॅड प्रताप ढाकणे यांच्या हस्ते संपन्न
खरवंडी कासार पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आरोग्य शिबिराचे उद्घाटन एडवोकेट केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन प्रताप काका ढाकणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले केंद्र सरकारच्या संकल्प निरोगी महाराष्ट्राच्या नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर जागृत पालक सुदृढ बालक अभियान यामध्ये कर्तव्य सर्व पालकांचे लसीकरण सर्व बालकांचे यामध्ये ० ते १८ वर्षा पर्यंतची बालके किशोरवयीन मुला मुलीचे सर्वांगीण आरोग्य तपासणी अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये खरवंडी परिसरातील बालके ,किशोरवयीन मुली, महिला ,नागरिक यावेळी या आरोग्य तपासणी शिबिरासाठी उपस्थित होते .
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, मा. पंचायत समिती सदस्य किरण खेडकर, मा. जि. परिषद सदस्य गहिनीनाथ दादा शिरसाट, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महारुद्र किर्तने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, सेवा सोसायटी चेअरमन भगवान दराडे, सिताराम बापू बोरुडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष वैभव दहिफळे ,सरपंच विष्णू थोरात ,खरवंडी कासार चे उपसरपंच रावसाहेब पवळे, शेषराव ढाकणे, विनोद घुले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.वृषाली दराडे, डॉ. मोनिका आघाव कर्मचारी व परिसरातले ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वृषाली दराडे यांनी केले तर आभार डॉ.मोनिका आघाव यांनी मानले