खरवंडी कासार येथे दुरण टेकडी येथे श्री विश्वकर्मा जयंती सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह संपन्न
वार्ताहर/ संपादक
अशोक आव्हाड
खरवंडी कासार येथे दुरण टेकडी येथे श्री विश्वकर्मा जयंती सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह संपन्न
खरवंडी कासार पाथर्डी तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेले भगवानगड रोड वरती दुरन टेकडी या ठिकाणी महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विश्वकर्मा जयंती सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला यामध्ये मंगळवार या दिवशी या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली व सांगता शनिवार या दिवशी करण्यात आली यामध्ये विश्वकर्मा प्रतिमेचे मिरवणूक व दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली त्यानंतर भगवान गडाचे ह भ प काशिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन झाले या किर्तनामध्ये सर्व भाविक मंत्रमुग्ध होऊन गेले त्यानंतर आलेल्या भाविकांना देवनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर दराडे यांनी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले यावेळी या कार्यक्रमासाठी ह.भ.प.बबन महाराज राठोड, विश्वकर्मा प्रदेशाध्यक्ष जनार्धन गाल पगारे सरपंच प्रदीप पाटील आयुक्त दिलीपराव खेडकर, प्रतिष्ठित व्यापारी नवनाथराव दहिवाळ, डॉ. मनोरमा ताई खेडकर मनसे जिल्हाध्यक्ष देविदास भाऊ खेडकर, देवनाथ हॉस्पिटलचे डॉ. ज्ञानेश्वर दराडे ,वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोल्हार, भाजपा युवा मोर्चाचे महेश बोरुडे व भगवानगड परिसरातील संपूर्ण भक्तगण व नागरीक हजारोच्या संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित होते तसेच विश्वकर्मा सामाजिक संस्था अध्यक्ष व सर्व सदस्य मंडळी यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते