सावन कृपाल रुहानी मिशन न्यु दिल्ली,शाखा-पैठण यांच्या संयुक्त विद्येमाने जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे ‘प्रथमच’कलाविष्कार सोहळा संपन्न
पैठण प्रतिनिधी
बबन उदावंत
सावन कृपाल रुहानी मिशन न्यु दिल्ली,शाखा-पैठण यांच्या संयुक्त विद्येमाने जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे ‘प्रथमच’कलाविष्कार सोहळा संपन्न
पैठण :जिल्हा परिषद शाळा मुलांची पैठण येथे,
केंद्र स्तरीय खेल महोत्सव-2023 बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाले. ह्या वेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी चंद्रकांत गायकवाड,यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यातआले.व सुब्ह सबेरे लेकर तेरा नाम प्रभु ह्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.ह्या वेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी1)संदेशे आते है,2)राज आल,राज आल, 3)जिन्को है बेटिया,4)हिंदुस्थान हमारा है,5)झुमे जो पठाण, 6)विंचु चावला,अश्या विविध रंगतदार कार्यक्रमातील गाण्यावर, गीत गायन व नृत्य करुन विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.ह्या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते केंद्र स्तरीय खेल महोत्सव प्रथम,द्वितीय, तृतीय विजेत्या संघांना ट्राफी प्रमाणपत्र ‘व’ रनिंग-100मिटर मधिल प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक खेळाडुंना मेडल व प्रमाणपत्राचे वितरण,तर एन.सी.सी.कॅण्डेट यांना ‘सी’ प्रमाण पत्र व वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम,द्वितीय,तृतीय,क्रमांंक विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात आले.ह्या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक:-चंद्रकांत गायकवाड(माजी उपप्राचार्य देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद) हे होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष:- किशोर पवार साहेब (पोलीस निरीक्षक पैठण) हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून-प्रकाश लोखंडे (शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पैठण)संताराम गोर्डे(केंद्र प्रमुख पैठण नंबर-02,)ज्ञानेश भाऊ घोडके माजी नगरसेवक पैठण ऊमर पठाण (माजी शिक्षक कन्या प्रशाला पैठण)जालिंदर पंजावाले (प्राथमिक शिक्षक)हे होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक- (मुख्याध्यापक)अंकुश गाढे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुञसंचालन- समशेर पठाण यांनी केले.शेवटीआभार-ताराचंद हिवराळे यांनी मानले.ह्या वेळी कार्यक्रमाची रुपरेषा पाहुन पालकांनी सर्व शिक्षकांचे स्वागत केले.कार्यक्रमासाठी,शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष -आप्सर शेख,उपाध्यक्ष-बाळु घोडके,(पञकार) बबन उदावंत,देवानंद वाघ,प्रमोद कुमार दैड,योगेश शिसोदे,शमीम पठाण,बाळू पाखरे,लक्ष्मण शिरसाठ,किरण घाटविसावे ,उद्धव दराडे,जालिंदर शिरसाठ,सचिन डमाळे,ज्ञाादेेव केदार,सुहास शिंदे, श्रीराम घोलप,बेग,शेख,पठाण, इत्यादी. शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,(ऊर्दू विभाग प्रमुख)फैय्याज शेख, दिलीप तांगडे,राजेश पाखरे,गणेश थोटे,प्रशांत चित्ते,वैशाली कुटे, मुस्कान कट्यारे,नेहा शेख,ज्योती बलखंडे,चाँद मामु यांनी परिश्रम घेतले.