समाज कल्याण अंतर्गत मागासवर्गीय लाभार्थी कडबा कुट्टी योजनची लकी ड्रॉ द्वारे लाभार्थ्याची निवड
समाज कल्याण अंतर्गत मागासवर्गीय लाभार्थी कडबा कुट्टी योजनची
लकी ड्रॉ द्वारे लाभार्थ्याची निवड
सुकळी प्रतिनिधी
सुखदेव गायकवाड
शेवगाव : समाज कल्याण विभाग अंतर्गत मागासवर्गीय लाभार्थी कडबा कुट्टी योजना सन 2022 -23 च्या लकी ड्रॉ द्वारे योजनेच्या लाभार्थ्याची निवड करण्यात आली दि.10.02.2023 रोजी शेवगाव पंचायत समिती सभागृहामध्ये पंचायत समिती गट विकास अधिकारी महेश डोके यांच्या मार्गदर्शना खाली या लकी ड्रॉ च्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली .
यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी दीप्ती गाट ‘ .गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते सहायक प्रशासकीय अधिकारी श्रीराम चव्हाण विस्तार अधिकारी डी. बी . शेळके .वरिष्ठ सहायक जगधने वसंत दशरथ . कनिष्ठ सहायक ।गटकळ प्रभाकर लक्ष्मण समाज कल्याण कर्मचारी तसेच धावणे कमलेश .यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगाव येथील तजवीन अशपाक बागवान ‘ ‘प्रताप बन्सी गायकवाड , या दोन लहान चिमुकल्याने 56 लाभार्थ्यापैकी 21 लाभार्थ्याचे लकी ड्रॉ पद्धतीने चिट्ठी काढून लाभार्थ्याचे नाव सांगण्यात आले ‘
21 लाभार्थी पात्र ठरले असुन खेळीमेळीच्या वातावरणात लकी ड्रॉ समाप्त करण्यात आला