प. महाराष्ट्र

उन्हाळी सुट्टी मध्ये ही चालू आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंदरवाडी

उन्हाळी सुट्टी मध्ये ही चालू आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंदरवाडी

वार्ताहर/ संपादक अशोक आव्हाड

उन्हाळी सुट्टी मध्ये ही चालू आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंदरवाडी

पाथर्डी- तालुक्यातील येळी केंद्रा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंदर वाडी येथे माझा एक तास या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे . सध्या उन्हाळी सुट्टी मध्ये ही मिशन आरंभ अंतर्गत शिष्यवृती/ नवोदय परिक्षा जादा सराव वर्ग चालू आहेत,अहमदनगर जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर व प्राथमिक शिक्षणधिकारी श्री भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या दोन वर्षांपासून मिशन आरंभ हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये राबविण्यात येत आहे शाळेतील उपक्रमशील मुख्या श्रीमती सुरेखा बडे व शिक्षक श्री संजय दराडे यांनी गेल्या वर्षी पासून दररोज सकाळीं ७:३० ते ९:०० या वेळेत उन्हाळी सुट्टीतील माझा एक तास हा उपक्रम सुरू केलेला आहे, त्याचे फलीत म्हणजे गेले वर्षी मिशन आरंभचा निकाल १००टक्के लागला, चालू वर्षी चौथी चा पट १० असून १००टक्के विदयार्थी उतिर्न होतील या साठी शाळेतली दोन्हीं शिक्षकासह बोंदरवाडी मधील बाहेरचा तालुक्यामध्ये कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक श्री विष्णू बडे, श्री बबन बडे, श्री वासुदेव बडे, देवीदास डमाळे बाबुराव डमाळे, शहादेव जायभाये राजन, ढोले, ए व्ही डमाळे हे शिक्षक स्वंय प्रेरणेने आपले अमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करतं आहेत, शाळेत मिशन आपुलकी अंतर्गत गेले वर्षी सुमारे एक लाख रूपये ग्रामस्थ यांनी निधी गोळा केला असून शाळेच्या भौतिक सुविधा भगविण्यात आल्या आहेत, शालेय शिक्षण समितीच्या नियमित बैठका घेऊन विद्यार्थी गुणवत्ता बाबत चर्चा केली जाते असे शिक्षण समिती चे अध्यक्ष श्री श्रीधर डमाळे यांनी सांगितले, ऊस तोडणी कामगारच्या गावात चालू असलेल्या नाविन्य पूर्ण उपक्रम बदल शाळेतील दोन्हीं शिक्षकांचे रामनाथ कराड शिक्षण विस्तार अधिकारी यांनी कौतुक करून विशेष अभिनंदन व सत्कार करण्यात आला. श्री कराड यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधत स्वतः वर्ग तपासणी चे माध्यमातून मार्गदर्शन केलें, सर्व स्तरमधून शिक्षक चे कौतुक होत आहे. यां प्रसंगी, येळी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री बाबा गोसावी साहेब,दादासाहेब डमाळे, हरिभाऊ डमाळे, भास्कर डमाळे, संजय डमाळे, श्री कल्याण कराड, रा का बडे सतिष डमाळे, भानुदास डमाळे, अशोक डमाळे, रामदास डमाळे, शहादेव डमाळे, विष्णु डमाळे, रामनाथ डमाळे, शिवनाथ डमाळे व मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आणि ग्रामस्थ, पालक, शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते,

-चौकट- (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंदरवडी शाळेत अहमदनगर जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी मा .श्री आशिष येरेकर साहेब व शिक्षणाधिकारी मा . श्री . भास्कर पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून मिशन आरंभ हा उपक्रम चालू आहे,उन्हाळी सुट्टी मध्ये या शाळेत शिष्यावर्ती पुर्व व नवोदय जादा सराव वर्ग चालू असून शाळेतील दोनही शिक्षक नियमित शाळेत येऊन मार्गदर्शन करतात, यां मुळे गेले पाच वर्षात शाळेचा पटसंख्या २० वरून ४५ झालाआहे, शाळेतील दोनही शिक्षक उपक्रमशिल असून गुणवत्ता वाढबरोबरच विदयार्थी हितासाठी प्रयत्न करणारे आहेत – श्री रामनाथ कराड, शिक्षण विस्तार अधिकारी, प. स. पाथर्डी)

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp ग्रुप जॉईन करा !