हनुमाननगर वस्ती शाळेतील ऊसतोड मजुरांची मुले घेणार हायटेक शिक्षण
वार्ताहर/ संपादक
अशोक आव्हाड
हनुमाननगर वस्ती शाळेतील ऊसतोड मजुरांची मुले घेणार हायटेक शिक्षण
निरंजन सेवाभावी संस्था व शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून सोलर पॅनलवरील डिजिटल क्लासरूमचे येत्या २८ रोजी लोकार्पण
पाथर्डी :
तालुक्यातील अत्यंत दुर्गमभागात असणाऱ्या खरवंडी कासार पासून जवळ असलेल्या हनुमाननगर (भारजवाडी) वस्तीशाळेतील अत्यंत सुंदर हस्ताक्षर असणारी ऊसतोड मजुरांची मुले आता हायटेक शिक्षण घेणार असून निरंजन सेवाभावी संस्था, अहमदनगर व शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरीयल फाउंडेशन यांनी “मिशन आपुलकी” अंतर्गत या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण सोलर पॅनलवर चालणारी डिजिटल क्लासरूमचा विद्यार्थी अर्पण सोहळा जागतिक विज्ञान दिनानिमित्त होणार आहे.
सुंदर हस्ताक्षर व विविध कला गुणांमुळे अत्यंत दुर्गम भागात असून सुद्धा जिल्ह्याभरात नावलौकिक कमवलेल्या हनुमाननगर वस्तीशाळा भगवानगडाच्या पायथ्याशी भगवान बाबांच्या पावन स्पर्शाने पवित्र अशा भूमित आहे. या शाळेतील लेकरांसाठी अहमदनगर येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे नगर जिल्ह्याचा कोहिनुर म्हणून ज्यांची ओळख आहे असे शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरीयल फाउंडेशन आणि नगरचे नरेंद्र फिरोदिया व शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्तम काम करणारे निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा व सर्व निरंजन सेवाभावी संस्थेचे सदस्य यांच्या संकल्पनेतून भव्य अशी संपूर्ण सोलर पॅनलवर चालणाऱ्या डिजिटल क्लासरूमचे २८ फेब्रुवारी रोजी लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यासाठी व विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे अवाहन सरपंच माणिक रामराव बटूळे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग भागवत बटुळे यांनी केले आहे.