खरवंडी कासार येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन
खरवंडी कासार येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन
वार्ताहर/ संपादक अशोक आव्हाड
खरवंडी कासार येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन
खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या
१०व्या पुण्यतिथीनिमित्त ऊस तोडणी मजूर व वाहतूक कामगारासाठी देवनाथ फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिवाराचे आयोजन करण्यात आले
यावेळी सकाळी प्रथम स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये तब्बल 130 रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यामध्ये 25 गरजू रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी तपासणी होऊन त्यांना नारायणगाव पुणे येथे नेण्यात आले या पुण्यतिथीनिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले असे शिबिर प्रत्येक महिन्याला खरवंडी कासार येथे होणार असून यावेळी जाहीर करण्यात आले यावेळी बोलताना देवनाथ फाउंडेशनचे डॉ. ज्ञानेश्वर दराडे म्हणाले की गेले दहा वर्षा पासून देवनाथ फाउंडेशनच्या वतीने मुंडे साहेबांच्या पुण्यस्मरणार्थ घेतलेले अनेक समाजपयोगी उपक्रमांचा आढावा घेत आगामी काळात ऊस तोडणी मजूर वाहतूक कामगारासाठी सकारात्मक आरोग्य चळवळ उभारणार असा संकल्प यावेळी करण्यात आला यावेळी मोहटादेवी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. श्रीधर देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले
यावेळी या कार्यक्रमासाठी श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे विश्वस्त डॉ. श्रीधर देशमुख, शिबिर समन्वयक शहादेव सांगळे, प्राध्यापक अविनाश दराडे, सरपंच सुनील खेडकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय किर्तने, ऊस तोडणी कामगार संघटनेचे पिराजी कीर्तने, रमेश पाटील अंदुरे, रामनाथ दादा खेडकर, बाळासाहेब कुटे, कपिल बांगर, अनिल जवरे, बाळासाहेब राऊत, अशोक खेडकर आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते
यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व आभार डॉ. विद्या दराडे यांनी केले