दिपक कमलाकर दुसाने यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी यासाठी CID ऑफिसर दराडे यांना ओबीसी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी निवेदन देण्यात आले
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
दिपक कमलाकर दुसाने यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी यासाठी CID ऑफिसर दराडे यांना ओबीसी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी निवेदन देण्यात आले
नाशिक रोड येथील सोने-चांदी व्यावसायिक कै.दिपक कमलाकर दुसाने यांच्या आत्महत्या प्रकरणी आज दि.०३/०२/२०२३, शुक्रवार रोजी मेरी काॅलनी C.I.D.ऑफीस पंचवटी मेरी रोड येथे श्री दराडे साहेब यांना कै.दिपक दुसाने आत्महत्या प्रकरण सर्व प्रकारची माहिती ओबीसी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री गजु घोडके यांनी सविस्तर वर्णन करून निवेदन दिले व C.I.D.श्री दराडे साहेब यांनी निवेदन स्वीकारले व पुणे हेड ऑफिस पाठवुन परवानगी नुसार शोध व कारवाई करण्याचे आश्वासन दिले व तसेच नाशिक जिल्हा अधिकारी साहेब यांना सविस्तर माहिती देवुन निवेदन देण्यात आले व त्यांनी हि आश्वासन देवुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असुन नंतर आम्ही सर्वजण कै.दिपक दुसाने यांचे नातलग वकील श्री राहुल कासलीवाल यांनाही श्री गजु घोडके यांनी सविस्तर माहिती दिली व श्री कासलीवाल वकील यांनी सेशन कोर्टात दावा दाखल करून पुढील कारवाईचे पाऊल खंबीर उचलुन परत उद्या 2 वाजता माझ्या ऑफिसला या व पुढील दिशा ठरवु या प्रसंगी कै.दिपक दुसाने यांचे नातलग सह समस्त सोनार समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व या उपस्थिति नुसार कै.दिपक दुसाने या सामाजिक सोने-चांदी व्यावसायिकास न्याय मिळण्याचे चित्र आज निर्माण झाले व या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता व भावी नगरसेवक श्री प्रतिक राजेंद्र वडनेरे यांनी याहि पेक्षा खंबीर भुमिका घेवुन समाज आंदोलन झालंच पाहिजे व दुसाने परिवारास न्या मिळालाच पाहिजे व सोनार समाज एकसंघटीत होणे जरुरीचे होवुन बसले असे उदगार काढले व ओबीसी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री गजु घोडके व ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष श्री कृष्णाजी बागुल व समाज बांधव उपस्थित होते