बोधेगाव येथील सुलेमान बागवान व इतर शेतकरी होते अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत ….वंचित बहुजन आघाडीने मिळवून दिला अवघ्या तीन महिन्यात न्याय…
Bodhegaon Shevgaon
शेवगाव प्रतिनिधी संतोष चिंतामणी
बोधेगाव येथील सुलेमान बागवान व इतर शेतकरी होते अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत ….वंचित बहुजन आघाडीने मिळवून दिला अवघ्या तीन महिन्यात न्याय…
बोधेगाव: येथील बागवान कुटुंबातील शेतकऱ्यांची जमीन अनेक वर्षापासून (80 आर. )दोन एकर जमीन रस्ता पड म्हणून उताऱ्यावरून कमी झाली होती. त्याकाळी रस्त्यासाठी इतर जमिनी संपादित झाल्या होत्या व त्यांचा मोबदला त्यांना मिळालेला होता. परंतु बागवान कुटुंबातील शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या नावावरून कमी होऊन रस्ता पड म्हणून लागली होती. त्या जमिनीचा मोबदला त्यांना मिळाला नव्हता आणि जमीनही उताऱ्यावरून कमी होऊन रस्ता पड म्हणून लागली होती.तेल ही गेले तूपही गेले अशी अवस्था बागवान कुटुंबीय शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून झालेली होती. अनेक वर्षापासून बागवान शेतकरी प्रशासनाकडे अर्ज करत होते अनेक वेळा त्यांनी उपोषणे केली प्रत्येक सरकारी विभागाला निवेदने दिली परंतु त्याचा काही एक उपयोग न होता. त्यांच्या पदरी निराशा पडली. मागील काळात पुन्हा एकदा मंडल अधिकारी बोधेगाव कार्यालयासमोर त्यांनी उपोषण केले होते. उपोषण होऊन तीन महिने झाले तरी त्यांचा काहीही निर्णय झाला नव्हता. व त्याची दखल घेतली गेली नव्हती अखेरचा पर्याय म्हणून सुलेमान बागवान व इतर सह धारक शेतकरी यांनी प्राध्यापक किसन चव्हाण सर यांना पत्रव्यवहार करून विनंती केली होती की आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.त्यांनी पाठवलेल्या पत्राची दखल घेऊन प्रा. किसन चव्हाण सरांनी तेथील स्थानिक पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण यांना जातीने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत मागे हटायचे नाही असा आदेश दिला. त्यानंतर बन्नू भाई शेख यांनी वंचित महिला अध्यक्ष संगीता ताई ढवळे यांच्या खंबीर साथीने व शहराध्यक्ष धोंडीराम मासळकर यांच्या सोबतीने पाठपुरावा चालू केला. जिल्हाधिकारी कार्यालय ते प्रांत कार्यालय,तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी ऑफिस या ठिकाणाहून संबंधित प्रकरणाची कागदपत्रे गोळा केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात महिला तालुका अध्यक्ष संगीताताई ढवळे ह्या नगर पर्यंत तीन वेळा बन्नू शेख यांच्यासह गेल्या फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा या हेतून व त्याचा पाठपुरावा केला. त्यानंतर तहसील दारांसमोर प्रकरणाची सुनावणी लागली. त्या सुनावणीला शेतकऱ्यांसहित वंचित चे पदाधिकारी उपस्थित राहत होते. अगदी शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांसह मैदानात होती. प्रांत कार्यालय पाथर्डी येथे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद भाऊ सोनटक्के यांचे सहकार्य लाभले. शेवगाव तहसील मध्ये प्यारेलाल भाई यांनी सहकार्य केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा महासचिव योगेश भाऊ साठे संघटक फिरोज भाई पठाण यांनी सहकार्य केले. ही सर्व प्रक्रिया प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनानुसार चालत होती. त्यामुळे बोधेगाव येथील गट नंबर 286 मधील रस्ता पड म्हणून लागलेली व अनेक वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली जमीन शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर येणार आहे. तसे आदेश तहसीलदार साहेब यांनी काढले आहेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने अनेक वर्ष वंचित असलेल्या शेतकऱ्यांना संविधानाच्या माध्यमातून व कोणतेही सत्ता नसताना न्याय दिलेला आहे. व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलवले आहे.अनेक वर्ष प्रस्थापित राजकारण्यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊ नये ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्यांचा फक्त मतांसाठी उपयोग करायचा आणि त्यांना वाऱ्यावर सोडायचं हे काम सत्ताधारी करत आलेले आहेत. वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्या समवेत कायम उभी आहे त्यांचे कोणतेही प्रश्न असो ते मार्गी लावण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत राहील.