प. महाराष्ट्र

विजवाहक तारा व पुरवठा यंत्रणा नवीन बसवण्यात याव्यात सिंगल फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा अन्यथा आंदोलन करू-सरपंच भोरु म्हस्के

वार्ताहर/ संपादक
अशोक आव्हाड

विजवाहक तारा व पुरवठा यंत्रणा नवीन बसवण्यात याव्यात सिंगल फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा अन्यथा आंदोलन करू- भोरु म्हस्के

पाथर्डी प्रतिनिधी:- कोरडगाव हे तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेले व शासनास मोठा महसुल मिळवुन देणारे गाव असुनही नागरिकांच्या मूलभूत मागण्यांकडे प्रशासनातील विभाग नागरिकांना सेवा देण्यासाठी दुर्लक्ष व दिरंगाई करतात. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला अनेक वर्षापासून मागणी करूनही गावाला सिंगल फेज विद्युत पुरवठा होत नाही. तसेच कालबाह्य व जुनी झालेली पथदिवे आणि वीज वाहक तारा व पुरवठा यंत्रणा नवीन बसवण्यात याव्यात. सिंगल फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी मागणी कोरडगाव ग्रामपंचायत व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वीज वितरण कंपनीला करण्यात आली. अन्यथा कोरडगाव येथे 24 फेब्रुवारी रोजी तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे महावितरण ला देण्यात आला आहे.
यावेळी वंचित चे तालुकाध्यक्ष भोरु उर्फ रवींद्र म्हस्के, कोरडगावच्या सरपंच म्हस्के, ग्रा.पं.सदस्य लहानु वाळके, जालिंदर मुखेकर, सुखदेव तुपेरे, सर्जेराव सानप, अण्णासाहेब कुसळकर, बबन गावडे, बबनराव मुखेकर, बाबुराव देशमुख, एकनाथ ढोले, करण पवार, प्रकाश बर्डे, संतोष जाधव यांच्यासह मुखेकरवाडी व कोरडगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
याविषयी बोलताना म्हस्के म्हणाले की, कोरडगाव येथील सार्वजनिक वीज वितरण व्यवस्था ही कालबाह्य झाली असून सुमारे पन्नास वर्षा अगोदर उभारलेले विजेचे खांब, पथदिवे अनेक ठिकाणी पडले व वाकले असुन लोंबकळत असलेल्या विद्युत वाहकतारा यामुळे शहरातील नागरिकांना धोका संभव होऊ शकतो. ते सर्व खांब व विद्युत वाहक तारा बदलण्यात याव्यात. तसेच अनेक दिवसापासून मागणी असलेली सिंगल फेज विद्युत पुरवठ्याची मागणी पूर्ण करण्यात यावी. या भागातील विद्यार्थ्यांचे लोड शेडिंग मुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे ताबडतोब सिंगल फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा 24 फेब्रुवारी रोजी कोरडगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे म्हस्के यांनी दिला आहे

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण वाचा
Close
Back to top button