भालेश्वर हायस्कूल भालगाव चा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
वार्ताहर /संपादक
अशोक आव्हाड
भालेश्वर हायस्कूल भालगाव चा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
खरवंडी कासार: भालेश्वर हायस्कूल, भालगाव ता.पाथर्डी शाळेचा पारितोषिक वितरण सोहळा दिमाखदारपणे पार पडला. अतिथी या नात्याने माझी(दीपक महाले) उपस्थिती होती. शालेय इमारत सर्व सोयींनी सुसज्ज आहे. चित्रकला, रांगोळी, मेहंदी, सामान्य ज्ञान, विविध क्रीडा, नृत्य इत्यादी विविध भरगच्च स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, आकर्षक पेन व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे एकूण पटापैकी बहुतेक विद्यार्थी एक वा एकापेक्षा जास्त स्पर्धांमध्ये सहभागी झालेले होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधत माझे कथाकथन, कविता सादरीकरण नि व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिक संपन्न झाले. ‘सर रामूचा फोटो काढतात’ या कथेस विद्यार्थ्यांनी दाद दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत ह. भ. प .नवनाथ महाराज शास्त्री, मायंबा गड हे होते.अतिथी साहित्यिक अनंत कराड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कविता सादर केल्या.कवितांना वाहवा मिळाली. कलाशिक्षक श्री.बर्डे सर यांनी केलेल्या आकर्षक फलकलेखनाने उपस्थितांची मने जिंकली. शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री पल्हारे सर यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक श्री हनुमान गोर्डे सर यांनी प्रास्ताविक केले. बहारदार सूत्रसंचलन श्री. पाचंग सर यांनी केले .आभार प्रदर्शन समन्वयक श्री. नजन सर यांनी केले