भालगाव येथे परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे यांच्या उपस्थितीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न
वार्ताहर /संपादक
अशोक आव्हाड
भालगाव येथे परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे यांच्या उपस्थितीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न
पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे यांच्या उपस्थितीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार मोनिकाताई राजळे यांना देण्यात आले यावेळी परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्षा डॉ. मनोरमाताई खेडकर व प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर साहेब, महिला आघाडीच्या काशी ताई गोल्हार ,भाजपा तालुकाध्यक्ष माणिक मामा खेडकर ,महादेव जायभाये, तुकाराम खेडकर, तुकाराम केदार ,उद्धव खेडकर, संजय बेंद्रे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
यावेळी महिलांमध्ये ग्रामपंचायत सदस्य पार्वती खेडकर, जयश्री बेद्रे, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी कासुळे, कल्पना केदार, वैशाली खेडकर, आशाबाई रोकडे, संजीवनी रोकडे आदि हजोरोच्यां संख्येने महिला यावेळी उपस्थित होत्या.
महिलांनी यावेळी एकमेकीला हार्दिक कुंकू लावून वानांमध्ये साडी चोळी भेट देऊन तिळगुळ देऊन एकमेकींचा सन्मान करण्यात आला
यावेळी बोलताना आमदार मोनिकाताई राजळे म्हणाले की डॉ.मनोरमाताई खेडकर यांचे कौतुक करावं तेवढे कमी आहे याचे कारण म्हणजे त्या सतत परिवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने वेगवेगळ्या माध्यमातून वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतात यामध्ये बचत गटासाठी असतील हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतील पाणलोट क्षेत्रातील असतील अशा विविध कार्यक्रमांमधून ते जनतेची सेवा करत असतात असेच कार्यक्रम मनोरमाताईंनी सतत घेत राहावे अशा शुभेच्छा यावेळी आमदार ताईंनी दिल्या व त्यांचे कौतुकही केले