भगवानगड परिसर प्रेस क्लब कडून लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवन गौरव पुरस्काराचे वितरण संपन्न
वार्ताहर /संपादक
अशोक आव्हाड
भगवानगड परिसर प्रेस क्लब कडून लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवन गौरव पुरस्काराचे वितरण संपन्न
खरवंडी कासार पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे भगवानगड परिसर प्रेस क्लब आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनाचे औचित्य साधत सामाजिक शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या समाजातील जडणघडणीत योगदान देणाऱ्या कार्यधुरंदर व्यक्तींना लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवनगौरव भगवानगड परिसर भूषण आणि बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भगवानगड परिसर प्रेस क्लबचा दरवर्षीप्रमाणे साजरा होणाऱ्या या कार्यक्रमाला संभाजीनगर येथे कार्यरत असणारे प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर सालसिद्धबाबा संस्थांनचे महंत ह भ प हनुमंत महाराज शास्त्री तसेच पाथर्डी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लिमकर पंचायत समिती सभापती सुनिता दौंड भाजप तालुका अध्यक्ष मानिक खेडकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक बाळासाहेब गोल्हार भाजपा महिला अध्यक्ष काशीबाई गोल्हार शिक्षक नेते मिथुन डोंगरे डाॅ राजेंद्र खेडकर ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख भगवान दराडे शिंदे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे अंकुश कासुळे किसन आव्हाड डॉ ज्ञानेश्वर दराडे सरपंच सुरेखा ढाकणे भगवान दराडे आजिनाथ दराडे भगवान हजारे रशीद तांबोळी महेश हजारे महेश बोरुडे अमोल जायभाये योगेश अंदुरे बाळासाहेब जवरे सुनील ढाकणे आणि सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थित होते.
भगवानगड परिसर प्रेस क्लब या सामाजिक पत्रकार संघटनेने ऊसतोड मजूर वंचित पीडित गरीब घटकांच्या न्याय हक्क व प्रश्नांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवला असून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत संत भगवानबाबा आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराने प्रेरित होऊन भगवानगड परिसर प्रेस क्लब समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य करणार आहे – लोकपत्रकार प्रा दादासाहेब खेडकर अध्यक्ष भगवानगड परिसर प्रेस क्लब भगवानगड परिसर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अशोक आव्हाड सचिव विजय शिवगजे कोषाध्यक्ष रमेश देवा जोशी सहसचिव किरण शिरसाठ कार्याध्यक्ष गणेश बोरुडे संपर्कप्रमुख जनार्दन बोडखे प्रसिद्धीप्रमुख भिमराज सुपेकर सदस्य सोमराज बडे शौकत शेख गोरक्ष खेडकर इत्यादी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले
लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवनगौरव पुरस्कार ( नितेश बनसोडे – सावली प्रतिष्ठान अहमदनगर )
भगवानगड परिसर भूषण पुरस्कार
संजय फुंदे – ( भगवान प्रतिष्ठाण संस्था पाथर्डी )
आरती केदार – (महिला क्रिकेटपटू पाथर्डी )
रामहरी खेडकर – ( पीएसआय पाथर्डी )
बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता गौरव पुरस्कार
कुमार कडलग (दैनिक प्रहार नाशिक)
भागवत तावरे ( दैनिक लोकाशा बीड )
नारायण पालवे ( दैनिक सार्वमत पाथर्डी )