श्री भगवान विद्यालया मध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
वार्ताहर/ संपादक
अशोक आव्हाड
श्री भगवान विद्यालयामध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पाथर्डी तालुक्यातील श्री भगवान विद्यालय भगवानगड येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला एवढी प्रथम खरवंडी गावांमधून प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर भगवान विद्यालयाचे मुख्याध्यापक गंगाधर भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी भगवानगडाचे ह भ प संतोष महाराज गीते हे होते व प्रमुख पाहुणे भगवानगडाचे विश्वस्त पांडुरंग आंधळे गुरुजी शालेय समिती सदस्य भास्करराव खेडकर, निलेश जी अंदुरे ,अर्जुन आव्हाड सर, गंगाधर ढाकणे गुरुजी, मोहन दराडे ,ओम शर्मा आदी मान्यवर या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते
यावेळी मागील वर्षांमधील सन 2022 मधील इयत्ता दहावी एस एस सी बोर्डामध्ये प्रथम येणार विद्यार्थी स्नेहल आंधळे हिचा सत्कार संतोष गीते महाराज व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच यावर्षी क्रीडा क्षेत्रातील विभागीय पातळीवरील उंच उडी या खेळ प्रकारांमध्ये विभागातून द्वितीय व शैला जायभाय कुस्ती खेळ प्रकारामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम यांचा सत्कार यावेळी भगवानगडाचे विश्वस्त पांडुरंग आंधळे यांच्या हस्ते करण्यात आला
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही खेळ प्रकार घेण्यात आले यामध्ये नववी विरुद्ध दहावी खोखो सामना घेण्यात आला यामध्ये विजेत्या संघाचे इयत्ता दहावी या संघाचे कार्यक्रमाचे अध्यक्षानी व प्रमुख पाहुणे व ग्रामस्थ मंडळी यांच्याकडून कौतुक करण्यात आले यावेळी खरवंडी कासार मधील सर्व ग्रामस्थ कर्मचारी वर्ग विद्यार्थी व आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण शिरसाट यांनी केले तर आभार सुरेश थोरात यांनी मानले