श्री भगवान विद्यालय भगवानगड येथे एस एस सी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
वार्ताहर/ संपादक
अशोक आव्हाड
श्री भगवान विद्यालय भगवानगड येथे एस एस सी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
खरवंडी कासार पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील श्री भगवान विद्यालय भगवानगड येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला
या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी भगवानगडाचे विश्वस्त पांडुरंग आंधळे गुरुजी हे होते तर प्रमुख पाहुणे ह. भ. प. दराडे महाराज हे होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली आतापर्यंत पाचवी ते दहावी विद्यालयामधील अनुभव विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून व्यक्त केली आम्ही विद्यार्थी भाग्यवान आहोत कि भगवान बाबांनी स्थापन केलेल्या विद्यालयांमध्ये आम्हाला शिक्षण घेता आले याचा आम्हाला सार्थ अभिमान असून पुढील काळामध्ये पुढील शिक्षणासाठी आम्ही कुठेही गेलो तरी आम्ही भगवान विद्यालयालयाचा कधीच विसर पडू देणार नाहीत आम्ही नशिबवान आहोत भगवान बाबांच्या शाळेमध्ये आम्हाला शिक्षण घेता आले भगवान विद्यालयातील शिक्षकांनी जे आम्हाला पाचवी ते दहावी शिक्षण देऊन घडवले आहे या शिक्षणाच्या जोरावर आम्ही भगवान विद्यालयाचे नाव उज्वल करू असे यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले
यावेळी विद्यालयातील पर्यवेक्षक वसंत खेडकर सर, धर्मराज शिरसाट सर, स्वामिनी कीर्तने मॅडम, यांनी आपले मनोगत व्यक्त केली मनोगत व्यक्त करताना सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी या कार्यक्रमासाठी हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका पालवे व साक्षी वाघुलकर हिने केले तर आभार साक्षी नाटकर हिने मानले. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना रुचकर असे भोजन घेऊन कार्यक्रमाचा शेवट गोड झाला.