श्री भगवान विद्यालया मध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी
वार्ताहर संपादक
अशोक आव्हाड
श्री भगवान विद्यालया मध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी
खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील श्री भगवान विद्यालय भगवान येथे शिवाजी महाराजांची जयंती अगदी उत्साहा मध्ये साजरी करण्यात आली यावेळी प्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एनटी शिरसाट सर हे होते यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या विषयी मनोगत व्यक्त केली अनेक मान्यवरांनी महाराजाविषयी इतिहास काळातील महाराजांच्या कामगिरीबद्दल उल्लेखनीय माहिती विद्यार्थ्यांना सांगितली या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक गंगाधर भालेराव ,पर्यवेक्षक वसंतराव खेडकर, चेतन आंधळे, संतोष कुलकर्णी, सुरेश सारूक, सुरेश थोरात, विठ्ठल कोळी, भगवान केदार ,अण्णा वारे, बाबासाहेब अंदुरे, श्रीमती स्वामिनी किर्तने बाळू मिसाळ ,अनिल खंडागळे, सचिन गायकवाड, गणेश आंधळे, अशोक स्वामी आदी मान्यवर शिक्षकेतर कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते