श्री भगवान विद्यालय भगवानगड येथे मुख्याध्यापक सुनील अंदुरे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
वार्ताहर /संपादक
अशोक आव्हाड
श्री भगवान विद्यालय भगवानगड येथे मुख्याध्यापक सुनील अंदुरे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
खरवंडी कासार पाथर्डी तालुक्यातील श्री भगवान विद्यालय भगवानगड येथे मुख्याध्यापक सुनील अंदुरे सर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न करण्यात आला व या सेवापूर्ती सोहळ्याच्या आयोजन श्री संत भगवान बाबा यांच्या 58 व्या पुण्यतिथी च्या दिवशी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सालाबादप्रमाणे तारखेनुसार राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांची ५८ पुण्यतिथी उत्साहामध्ये साजरी करण्यात आली त्यानंतर भगवान विद्यालय मध्ये पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी प्रथम श्री संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन भगवानगडाचे आचार्य नारायण स्वामीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आचार्य नारायण स्वामीजी महाराज यांना देण्यात आले होते यावेळी भगवान विद्यालया कडून त्यांचा संपत्नीक हार गुच्छ वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी आपली भाषणे करून सुनील अंदुरे सर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते ज्यावेळेस सुनील अंदुरे सर हे त्यांच्या सत्कार समारंभाच्या उत्तर देत असताना एवढे भावुक झाले होते की ते काही न बोलता थांबले व त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू थांबत नव्हते त्यांनी या विद्यालयांमध्ये 32 वर्ष आपली निरंतर सेवा केली व ते 32 वर्ष विज्ञान विषयाचा विद्यार्थी म्हणूनच वावरले व वयाच्या ५८ व्या वर्षी सेवापूर्ती होत असताना त्यांना अतिशय दुःखही होत होते
या कार्यक्रमासाठी भगवानगडाचे आचार्य नारायण स्वामी जी महाराज, ह भ प माऊली धायगुडे महाराज, प्रमुख पाहुणे भगवानगडाचे विश्वस्त पांडुरंग आंधळे, विश्वस्त राजू पाटील, मा. मुख्याध्यापक सुनील अंदुरे मुख्याध्यापक गंगाधर भालेराव ,स्कूल कमिटी सदस्य भास्कर दादा खेडकर संपूर्ण तालुक्यातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचारी, पत्रकार वर्ग ,प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर ,ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व आदि सर्व मान्यवर व विद्यार्थी वर्ग व परिसरातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत खेडकर यांनी केले सुत्रसंचालन संतोष कुलकर्णी तर आभार डी एन शिरसाट यांनी मांनले