जहागीर आर्ट गॅलरी मुंबई येथे 14 मार्च ते 20 मार्च प्रो. अरविंद कोळपकर यांचे चित्र प्रदर्शनाचे आयोजन
वार्ताहर/ संपादक
अशोक आव्हाड
जहागीर आर्ट गॅलरी मुंबई येथे 14 मार्च ते 20 मार्च प्रो. अरविंद कोळपकर यांचे चित्र प्रदर्शनाचे आयोजन
पाथर्डी: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार गावातील मूळरहिवासी असलेले सध्या पुण्यात स्थायिक असेलेले चित्रकार श्री. अरविंद कोळपकर व सौ. हर्षदा कोळपकर यांचे चित्रप्रदर्शन दिनांक : 14 मार्च ते 20 मार्च 2023 या कालावधीत मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित केले आहे. अरविंद कोळपकर हे पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय मध्ये प्राध्यापक आहेत.आणि हर्षदा कोळपकर या चित्रकार कला क्षेत्रात 25 वर्षापासून कार्यरत आहेत. व त्यांच्या कलेला तोड नाही अशा पद्धतीची ही कला यांनी जोपासून ठेवलेली आहे त्यांना या पूर्वी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
या प्रदर्शनामध्ये अरविंद कोळपकर यांनी स्त्री आणि पुरुष यांचे भावनिक नातेसंबंध याच्यावर आकृती प्रधान चित्रमालिका केली.
हर्षदा कोळपकर यांनी कोकणस्मृती या संकल्पनेवर सृजनात्मक निसर्ग चित्र मालिका केली आहे.
हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे 14 ते 20 मार्च 2023 सर्वांसाठी खुले आहे.