आमदार निलेश लंके यांच्या हस्ते मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना निर्मिती योजनेतून फिरते विक्री केंद्र मालवाहू ४९ टेम्पोचे वितरण
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
आमदार निलेश लंके यांच्या हस्ते मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना निर्मिती योजनेतून फिरते विक्री केंद्र मालवाहू ४९ टेम्पोचे वितरण
पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना निर्मिती योजनेतून फिरते विक्री केंद्र मालवाहू ४९ टेम्पोचे वितरण करण्यात आले.
या योजनेअंर्गत सव्वा कोटींची सबसिडी देण्यात आली आहे.
बेरोजगार तरुणांना उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हात ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (सीएमईजीपी). योजनेतंर्गत अनेकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.राज्यातील सुशिक्षित, अर्धशिक्षित युवक व युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नविन संधी उपलब्ध करून देणासाठी महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम योजना’ सुरू आहे.उर्वरीत लाभार्त्यांच्या गाड्यांचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे.सदर योजनेद्वारे ग्रामीण भागातील अनेक तरुणांना हक्काचा रोजगार मिळणार आहे.