आबासाहेब काकडे डि फार्मसी महाविद्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
आबासाहेब काकडे डि फार्मसी महाविद्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन
बोधेगाव :शिक्षणासोबतच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शेवगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या बोधेगाव येथील आबासाहेब काकडे डी फार्मसी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात व सामाजिक उपक्रम राबवत साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, अनाथ व गरजु मुलांना शालेय व जिवन आवश्यक वस्तू जसे वही,पेन,फळे इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले व स्वच्छता मोहीम राबण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतीमा असलेल्या पंचवीस फुटी फ्लेक्सचे अनावरण करण्यात आले. महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य राजेश मोकाटे,पत्रकार आफताब शेख, प्राध्यापक सोमनाथ वडघने, देवीदास खराद यांच्याहस्ते आरती करण्यात आली.यावेळी जय भवानी जय शिवाजी,छत्रपती शिवाजी महाराज की जय अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धेत जायगुडे पुजा हिने प्रथम क्रमांक पटकावला,राठोड प्रियंका हिने द्वितीय क्रमांक, तर विशंभर राऊत याने तृतिय क्रमांक व चित्रकला स्पर्धेत अभिषेक म्हस्के याने प्रथम क्रमांक, घोडके रोहिणी हिने द्वितीय क्रमांक, तर बर्वे ओम याने तृतीय क्रमांक व रांगोळी स्पर्धेत जायगुडे पूजा हिने प्रथम क्रमांक , मुळे कामिनी हिने द्वितीय क्रमांक, व घोगांने पल्लवी हिने तृतिय क्रमांक पटकावला. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण करून सन्मानित करण्यात आले. गेवराई येथील सहारा अनाथालय व बालग्राम मधील अनाथ मुलांसाठी खाऊ व शालेय उपयोगी वस्तू चे वाटप करण्यात आले