आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसी बोधेगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसी बोधेगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.
बोधेगाव :येथील काकडे फार्मसी या महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला यावेळी कर्मयोगी आबासाहेब काकडे, निर्मला ताई काकडे विद्येची देवता सरस्वती डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी चव्हाण नरेंद्र, कु.झिंगरे प्राची, शुभम आवटे, पुरनाळे शिवानी, देवकाते कोमल आदींनी सी.व्हीं रमण यांच्या कार्याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राजेश मोकाटे होते. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात शास्त्र विज्ञान व तंत्रज्ञाना विषयी सखोल अशी माहिती दिली तसेच त्यांनी रमण इफेक्ट म्हणजे काय व फार्मसी मध्ये त्याचा काय उपयोग याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विविध शास्त्रज्ञांनी लावलेले शोध त्यामागचा इतिहास त्याचा मानवी जीवनावर झालेला परिणाम यांची माहिती तसेच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना -विद्यार्थ्यांना 4d म्हणजेच Decipline,Devotion,Dedication &direction देण्याचे आवाहन केले. जेणेकरून या महाविद्यालयातून उद्याचा संशोधक निर्माण होईल.
जुन्याचा बोध व नव्याचा शोध म्हणजे विज्ञान असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी कार्यक्रम प्रमुख प्राध्यापिका वणवे कांचन, असिफ शेख, सोमनाथ वडघने, देविदास खराद, गिराम शारदा आदी शिक्षक वृंद कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वर्षा कुऱ्हे,व बेंद्रे वैष्णवी यांनी तर आभार प्राध्या. वणवे कांचन यांनी मानले. या उपक्रमाचे संस्थेचे सेक्रेटरी ॲड. डॉ. विद्याधर काकडे साहेब, जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे विश्वस्त पृथ्वीसिंगभैय्या काकडे,मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मणराव बिटाळ यांनी कौतुक केले