प. महाराष्ट्र

आबासाहेब काकडे फार्मसी व लॉर्ड्स फार्मास्युटिकल प्रा. ली. यांच्या मध्ये सामंजस्य करार

शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी

आबासाहेब काकडे फार्मसी व लॉर्ड्स फार्मास्युटिकल प्रा. ली. यांच्या मध्ये सामंजस्य करार

आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसी व लॉर्ड्स फार्मास्युटिकल अँड रिसर्च सेंटर प्रा. लि. औरंगाबाद यांच्या मध्ये सामंजस्य करारकरण्यात आला. या करारांअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्लॅन्ट व्हीसिट,ट्रेनिंग, फार्मा कंपन्यामधील कामकाज आदी विषयी वेगवेगळ्या कार्यशाळा तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मार्गदर्शन व प्लेसमेंट आदी बाबत सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन लॉर्ड्स फार्मास्युटिकल चे कार्यकारी संचालक डॉ. आर. एल. सावंत साहेब यांनी दिले. या अंतर्गत महाविद्यालयातील सुमारे50विद्यार्थांना एकदिवसीय फार्माइंडस्ट्री व्हीसिट करण्यात आली, तसेच या कंपनी मधील दुर्मीळ अशा वनौषधी प्लांट ला देखील भेट देण्यात आली. परिसरातील नैसर्गिक उद्यान, स्विमिंग आदी बाबींचा विद्यार्थांनी मनसोक्त आनंद लुटला. अशी माहिती प्राचार्य राजेश मोकाटे यांनी दिली. सदर फार्मा इंडस्ट्री व्हीसिट चे नियोजन महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक शेख असिफ, प्राध्यापिका गिराम शारद, श्री. सतिश गोरे यांनी केले. या उपक्रमाचे संस्थेचे सेक्रेटरी ॲड. डॉ. विद्याधर काकडे साहेब, जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे विश्वस्त पृथ्वीसिंगभैय्या काकडे,मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मणराव बिटाळ यांनी कौतुक केले.

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button