श्री भगवान विद्यालय भगवानगड येथे श्री संत भगवान बाबा यांची तारखेनुसार पुण्यतिथी उत्साहात साजरी
वार्ताहर /संपादक
अशोक आव्हाड
श्री भगवान विद्यालय भगवानगड येथे श्री संत भगवान बाबा यांची तारखेनुसार पुण्यतिथी उत्साहात साजरी
खरवंडी कासार पाथर्डी तालुक्यातील श्री भगवान विद्यालय भगवानगड येथे सालाबादप्रमाणे तारखेनुसार राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांची ५८ पुण्यतिथी उत्साहामध्ये साजरी करण्यात आली सकाळी प्रथम भगवान बाबांच्या प्रतिमेची ग्राम प्रदक्षिणा विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी खरवंडी गावातून काढण्यात आली व या ग्रामप्रदक्षिणेमध्ये भगवान बाबा की जय जय भगवान बाबा अशा बाबाच्या नावांच्या घोषणा देत संपूर्ण गावातून ही ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली त्यानंतर भगवान विद्यालय मध्ये पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी प्रथम श्री संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन भगवानगडाचे आचार्य नारायण स्वामीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आचार्य नारायण स्वामीजी महाराज यांना देण्यात आले होते त्यानंतर ह.भ.प.माऊली महाराज धायगुडे भगवानगड यांचे प्रवचन झाले धायगुडे महाराजांच्या प्रवचनाने सर्व विद्यार्थी नागरिक मंत्रमुग्ध झाले धायगुडे महाराज बोलताना म्हणाले की विद्यार्थी घडवावे अशी सुबुद्धी त्या त्यांच्यामध्ये निर्माण केली बाबांचा एक मूलमंत्र होता एकर विका व मुलांना शिकवा का कारण की शिक्षणाने माणूस मोठा होतो आज जगामध्ये जे जे माणसे मोठे आहे ज्यांचे नाव आहे ते फक्त ज्ञानाने मोठे आहेत पैशाने श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीचे नाव लौकिक कीर्ती काही होत नाही त्यांना तात्पुरते लोक मानतील परंतु कीर्ती मोठी होत नाही जे माणसे ज्ञान कमवतात त्यांची कीर्ती अजरामर राहते बाबांना आज जाऊन 58 वर्षे झालेत परंतु आजही बाबांची कीर्ती सगळ्या जगामध्ये आहे त्यामुळे बाबाची ख्याती सांगावी तेवढी कमीच आहे असे यावेळी प्रवचनांमध्ये धायगुडे महाराज यांनी व्यक्त केले
या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी भगवानगडाचे आचार्य नारायण स्वामीजी महाराज, ह भ प माऊली धायगुडे महाराज, प्रमुख पाहुणे भगवानगडाचे विश्वस्त पांडुरंग आंधळे, विश्वस्त राजू पाटील, मा. मुख्याध्यापक सुनील अंदुरे मुख्याध्यापक गंगाधर भालेराव ,स्कूल कमिटी सदस्य भास्कर दादा खेडकर संपूर्ण तालुक्यातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचारी, पत्रकार वर्ग ,प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर ,ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व आदि सर्व मान्यवर व विद्यार्थी वर्ग व परिसरातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत खेडकर यांनी केले सुत्रसंचालन संतोष कुलकर्णी तर आभार डी एन शिरसाट यांनी मांनले